वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या १२ वर्षीय मुलीने दुसऱ्यांदा काढला पळ

वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या १२ वर्षीय मुलीने दुसऱ्यांदा काढला पळ

छिल्लरच्या मते कोविड-१९ काळात महिलांवरील अत्याचारात वाढ.

सायन येथील मानवसेवा बालश्रम येथून पळून गेलेल्या १२ वर्षाच्या मुलीचा शोध घेऊन तिला वैद्यकीय तपासणीसाठी सायन रुग्णालयात आणले असता या मुलीने महिला पोलिसांची नजर चुकवून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून महिला पोलिसांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सायन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हिर्लेकर यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

बीएसएफकडून चीनी गुप्तहेराला अटक

नरेंद्र मोदींना संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाकडून शाबासकी

महाराष्ट्रातील हे जिल्हे चिंताजनक…

जोकोविचने सर केला ‘एव्हरेस्ट’

रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकावर फिरणाऱ्या १२ वर्षे आणि ८ वर्षाच्या दोन मुलींना ताब्यात घेऊन त्यांना बाल कल्याण समितीच्या ताब्यात दिले होते. बाल कल्याण समितीने या दोन्ही मुलींची सायन येथील मानव सेवा बालश्रमात रवानगी करण्यात आली होती. त्यापैकी १२ वर्षाच्या मुलीने मानवसेवा बालश्रम येथून पळ काढला होता.

याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करून गुरुवारी या १२ वर्षाच्या मुलीचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले होते. दरम्यान या मुलीला सायन पोलिसांनी बाल कल्याण समितीच्या ताब्यात दिले असता या समितीने या मुलीची रवानगी उमरखाडी येथील बाल सुधारगृह येथे करण्यास सांगितले. तत्पूर्वी, या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश बाल कल्याण समितीने दिले होते. गुरुवारी या मुलीला सायन पोलीस ठाण्याच्या दोन महिला पोलीस शिपाई सायन रुग्णालयात घेऊन आल्या होत्या.

या दरम्यान गर्दीचा फायदा घेत महिला पोलिसांची नजर चुकवून या मुलीने तेथूनही पळ काढला आहे. या प्रकरणी सायन पोलीसानी गुन्हा नोंद करून या मुलीचा शोध घेण्यासाठी विषेश पथक तिच्या मागावर पाठवले असल्याची माहिती सायन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज हिर्लेकर यांनी दिली तसेच या दोन महिला पोलिसांची चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचे हिर्लेकर यांनी सांगितले.

Exit mobile version