30 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरक्राईमनामापेट्रोल बॉम्ब फेकून हिंदू नेते कमल देवगिरी यांची हत्या

पेट्रोल बॉम्ब फेकून हिंदू नेते कमल देवगिरी यांची हत्या

भरचौकात फेकल्या बॉटल बॉम्ब बाटल्या

Google News Follow

Related

पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील चक्रधरपूर येथील गिरिराज सेनेचे हिंदू नेते कमल देवगिरी यांची हत्या करण्यात आली आहे. शहरातील भारत भवन येथील सरस्वती शिशु विद्या मंदिर तुलसी भवनजवळ शनिवारी सायंकाळी गुन्हेगारांनी पेट्रोल बॉम्ब फेकून त्यांची हत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजताची आहे. कमलदेव गिरी यांच्यावर बॉम्ब हल्ला झाल्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचताच शेकडो तरुणांनी रेल्वे रुग्णालय चक्रधरपूर गाठले या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

शनिवारी संध्याकाळी कमलदेव गिरी हा त्याचा साथीदार शंकर सिंह याच्यासोबत मोटरसायकलवरून रेल्वे स्टेशनवर गेले होते . परतत असताना ते भारत भवन शाळेजवळ थांबले. तिथे आधीच रेकी केलेले तीन तरुण पायीच पोहोचले. त्यांनी बॉटल बॉम्ब प्लास्टिकमध्ये ठेवले होते. कमलदेव गिरी उभे असल्याचे पाहून त्यांच्यावर मागून बाटली बॉम्बने हल्ला केला. पहिला बॉम्ब डोक्यावर लागताच कमलदेव गिरी जमिनीवर कोसळले.  गिरी यांनी सहकारी शंकर सिंगला पळून जाण्यास सांगितले. यानंतर गुन्हेगारांनी पुन्हा बॉम्ब फेकला आणि तिन्ही तरुण पळून गेले. गिरी यांना चक्रधरपूर येथील रेल्वे रूग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कमलदेव गिरी यांच्यावर बॉम्ब हल्ला झाल्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचताच शेकडो तरुणांनी रेल्वे रुग्णालय चक्रधरपूर गाठले. गिरी यांचा मृतदेह बघून सगळ्यांना दुःख अनावर झाले. यादरम्यान घरातील सदस्यही तेथे पोहोचले. या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे ही वाचा:

सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे शिंदे गटात

गुजरातमध्ये काँग्रेसच्या १५ दिवसांत २५ रॅली

बाबा रामदेव यांना धक्का; पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी

मुंबईसह ठाणे पोलीस दलात मोठा फेरबदल

हिंदू नेता होते तरुणामध्ये लोकप्रिय

हिंदू नेता कमळ देवगिरी हे पश्चिम सिंगभूमच्या चक्रधरपूरमध्ये गिरीराज सेना ही हिंदू संघटना चालवत होते. तरुणांमध्ये ते लोकप्रिय होते. त्यांची लोकप्रियता वाढत चाललेली होती. ते लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार होते, त्यामुळंच त्यांची हत्या असा कयास आहे. या हत्येनंतर संपूर्ण चक्रधरपूरमध्ये वाढता तणाव पाहता प्रशासनानं कलम १४४ लागू केलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा