होर्डिंग दुर्घटना प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे

भिंडेचा ताबा पुन्हा गुन्हे शाखा कक्ष ७कडे देण्यात आला आहे.

होर्डिंग दुर्घटना प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण पंतनगर पोलिसांकडून मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.गुन्हे शाखा कक्ष ७ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे या प्रकरणाचा तपास करणार आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला गुरुवारी उदयपूर येथून गुन्हे शाखा कक्ष ७ च्या पथकाने अटक करून मुंबईत आणले होते.

आरोपीला शुक्रवारी पंतनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले होते, पंतनगर पोलीस भिंडे याला राजवाडी रुग्णालयत वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाणार होते. तत्पूर्वी हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यामुळे भिंडेचा ताबा पुन्हा गुन्हे शाखा कक्ष ७कडे देण्यात आला आहे. गुन्हे शाखेकडून भिंडेला अटक करून किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

एमडीएच, एव्हरेस्ट मसाल्यांच्या आयातीवर आणि विक्रीवर नेपाळकडून बंदी

‘मोदींचे हात बळकट करा… तेच तुम्हाला या वादळातून सुखरूप तारतील’

“उद्धव ठाकरे जे पांचट जोक, टोमणे मारतात, ते शोभणारे नाही!”

एमडीएच, एव्हरेस्ट मसाल्यांच्या आयातीवर आणि विक्रीवर नेपाळकडून बंदी

घाटकोपरमध्ये घडलेल्या या घटनेत १६ जणांना हकनाक प्राण गमवावे लागले. हे होर्डिंग अनधिकृत पद्धतीने उभारण्यात आले होते. त्यासाठी पालिकेची परवानगी घेण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. २०२१मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार असताना हे होर्डिंग उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन भिंडे याच्यासंदर्भातील घटनाक्रम सांगितला.

Exit mobile version