जॉर्ज फ्लॉइडच्या भाचीवर गोळीबार

जॉर्ज फ्लॉइडच्या भाचीवर गोळीबार

नवीन वर्षाच्या दिवशी ह्यूस्टन येथील अपार्टमेंटमध्ये जॉर्ज फ्लॉइडची चार वर्षांची भाची तिच्या खोलीत झोपली असताना अज्ञात संशयितांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या. अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, मुलीच्या हृदयात गोळी लागली होती आणि तिची तातडीने शस्त्रक्रिया केली आता तिची प्रकृती स्थिर आहे. कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडला पोलिसांनी केलेली मारहाण आणि त्यात त्याचा झालेला मृत्यू या घटनेने मागे जग ढवळून निघाले होते.

तिच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, ” एरियाना तिच्या खोलीत झोपली होती. रात्री तिनच्या सुमारास झोपलेली असताना तिला गोळ्या घातल्या गेल्या. तिच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिचे कुटुंब तिला वारंवार तिच्या दिवंगत मामा ( जॉर्ज फ्लॉइड ) समर्थनार्थ निदर्शने आणि वर्णद्वेषाच्या रॅलीसाठी घेऊन जात असत.

हे ही वाचा:

पंजाब सरकारची चूक स्पष्ट; डीजीपीची हकालपट्टी

गोव्यात आणि उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना करणार महाविकास आघाडीचा प्रयोग

पाकिस्तानला गेलेले ते ३ कॉल कोणाचे?

आशीष शेलारांना धमकी देणारा सापडला

काय होते जॉर्ज फ्लॉइड प्रकरण???

जॉर्ज पेरी फ्लॉइड ज्युनियर हा एक आफ्रिकन-अमेरिकन माणूस होता ज्याची मिनियापोलिस, मिनेसोटा येथे डेरेक चौविन या पोलीस अधिकाऱ्याने २५ मे २०२० रोजी बनावट बिल वापरल्याचा संशय आल्याने अटक केले होते. आणि क्रूर पद्धतीने फ्लॉइडच्या मानेवर ९ मिनिटे गुडघा ठेऊन उभा होता. अशा परिस्थितीत फ्लॉइड श्वास घेऊ शकला नाही आणि त्याचा अटकेदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाविरुद्ध डेरेक चौविन या पोलीस अधिकाऱ्याला क्रूर हत्येसाठी वीस वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

फ्लॉइडच्या मृत्यूमुळे युनायटेड स्टेट्समध्ये पोलिस क्रूरता आणि वर्णद्वेषाच्या विरोधात त्यावेळी मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली होती.

Exit mobile version