गौतम गंभीरला ‘ISIS काश्मीर’ कडून जीवे मारण्याची धमकी

दिल्ली पोलिसांकडून तपास सुरू

गौतम गंभीरला ‘ISIS काश्मीर’ कडून जीवे मारण्याची धमकी

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. ‘ISIS काश्मीर’ नावाच्या मेल आयडीवरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या मेलनंतर गौतम गंभीर यांनी राजेंद्र नगर पोलिस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ही धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पहलगाममधील हिंदू पर्यटकांवर केलेला हल्ला हा प्रतिबंधित दहशतवादी गट लष्कर-ए-तोयबाची (एलईटी) शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटच्या दहशतवाद्यांनी केला होता. या हल्ल्यावर गौतम गंभीर यांनी स्वतः सोशल मीडियावर दुःख करत संताप व्यक्त केला आहे आणि जबाबदार असलेल्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील असे म्हटले होते. यानंतर त्यांना धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, धमकी मिळाल्यानंतर गंभीरने दिल्ली पोलिसांकडे एफआयआर दाखल केला आहे आणि सरकारकडून त्याच्या कुटुंबासाठी सुरक्षेची मागणी केली आहे. धमकीचा ईमेल गौतम गंभीर यांच्या एका कर्मचाऱ्याला मिळाला आहे. २२ एप्रिल रोजी दुपारी २ ते ७ वाजेच्या दरम्यान, त्यांच्या एका कर्मचाऱ्याला ‘ISIS काश्मीर’ कडून दोन ईमेल आले.

हे ही वाचा:

हिंदूंच्या अंगावर याल तर सगळे हिंदू तुमच्या अंगावर येवू, शक्ती कळायलाच हवी!

‘पहलगाम हल्ला : सचिन-कोहली दुखी’

पहलगाम हल्ल्याचा मुख्य सूत्रधार म्हणून सैफुल्लाह कसुरीचे नाव समोर! 

करारा जवाब मिलेगा !

गौतम गंभीरने तात्काळ दिल्ली पोलिसांकडे संपर्क साधला आणि औपचारिकपणे एफआयआर नोंदवण्याची विनंती सादर केली. गंभीरने त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी तात्काळ सुरक्षेची मागणी केली. त्याने राजेंद्र नगर पोलिस स्टेशनचे एसएचओ आणि मध्य दिल्लीचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) यांच्याशी संपर्क साधला आणि अधिकाऱ्यांना त्याच्या कुटुंबियांच्या संरक्षणासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले. गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही पहिलीचं वेळ नसून याआधी नोव्हेंबर २०२१ मध्येही गंभीर यांना खासदार असताना अशीच धमकी मिळाली होती.

शेवटी त्यांनी शेण खाल्लेच ! | Mahesh Vichare | Sanjay Raut | Sushma Andhare | Pahalgam | Kashmir |

Exit mobile version