आयसीस काश्मीरकडून गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी

आयसीस काश्मीरकडून गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गौतम गंभीरने यासंबंधीची माहिती दिल्ली पोलिसांना दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून ही धमकी ‘आयसीस काश्मीर’कडून देण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, माजी क्रिकेपटू गौतम गंभीरला ई- मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गौतम गंभीरला धमकी मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याच्या घराची सुरक्षा वाढवली आहे. ‘आयसीस काश्मीर’कडून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

हे ही वाचा:

भावना गवळींना ईडीचे समन्स मिळालेच नाही!

मोदी सरकार मांडणार क्रिप्टोकरन्सीचे विधेयक

निलेश साबळे म्हणाले, राणे साहेब पुन्हा अशी चूक होणार नाही!

उपराष्ट्रपतींचे निवासस्थान कुठे असावे हे पण सामान्य माणसाला विचारायचे की काय?

हा मेल मिळाल्यानंतर गौतम गंभीर याने रात्री मध्य दिल्ली पोलीस उपायुक्त श्वेता चौहान यांची भेट घेऊन आपली तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी त्याच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ केली आहे. पोलिसांकडून मेलची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी गौतम गंभीर चर्चेत आला आहे. नुकतेच गौतम गंभीरने काही दिवसांपूर्वी पंजाब काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांना निशाण्यावर घेतले होते.

Exit mobile version