डोंबिवलीमधील एक चाळ पहाटे गॅस सिलिंडरच्या स्फोटाने हादरली. या स्फोटामध्ये एक वयोवृद्ध माणूस जखमी झाला असून गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. स्थानिक रहिवाशी साखर झोपेत असताना हा गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला. डोंबिवली पश्चिमेकडील उमेश नगर देवी पाडा परिसरात राहणारे हनुमंत मोरे ह्यांच्या घरी सकाळी दिवाबत्ती करताना काडीपेटी लावली असता सिलेंडर गॅसचा स्फोट झाला.
दिवाबत्तीसाठी लावलेल्या काडीपेटीमुळे संपूर्ण घर पेटले. सोबतच इतर घरांचे ही नुकसान झाले आहे. स्वयंपाक घरातील गॅस स्फोटामुळे घरासह हनुमंत मोरे यांनाही आगीने भक्ष्य केलं. आगीत होरपळून हनुमंत मोरे ४०% टक्के भाजले असून त्यांना तातडीच्या उपचारासाठी रग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. सिलेंडर टाकीचा स्फोट इतका भयंकर होता कि, घरातील पत्रे उडून स्वयंपाक घरातील बहुतांश सामन जळून खाक झाले आहे. आर्थिक नुकसानही झाले. स्फोटाच्या आवाजाने पहाटे साडे तीन वाजता संपूर्ण परिसर जागा झाला.
डोंबिवली पश्चिमेकडील उमेश नगर परिसरात घडलेल्या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला, गॅस सिलेंडरच्या स्फोटात ६५ वर्षीय हनुमंत मोरे हे गंभीररीत्या भाजले असून, मोरे ह्यांना पुढील उपचारांसाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे, अशी माहिती त्यांचे चिरंजीव श्रीनिवास मोरे ह्यांनी दिली. संबंधित घटनेचा पोलिसांनी अपघाती नोंद केली आहे.
हे ही वाचा:
अमरनाथ यात्रेत ३ दिवसात ६ जणांचा मृत्यू
अश्विनी भिडे यांचे स्वागत करायला स्टाफ धावला!
शिंदे- फडणवीस फेविकॉलचा मजबूत जोड, टुटेगा नही!
महाविकास आघाडीच्या काळात राज्यात तब्बल २२ हजार ७५१ बालमृत्यू
वयोवृद्ध हनुमंत मोरे ह्यांच्या घरातील गॅस आधीपासून गळत असल्याची पुसटशी कल्पना देखील नव्हती. नेहमी प्रमाणे दिवाबत्ती करण्यासाठी त्यांनी काडीपेटीचा वापर केला असता एका ठिणगीने हा सिलेंडरचा स्फोट झाला. मोरे घरात एकटे राहत होते, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. या स्फोटानंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले व लगेचच बचावकार्य सुरु केले. अग्निशामक दलाच्या खास सूत्रांनी घटनास्थळाची माहिती दिली.