मुलुंडच्या व्यावसायिकाचे अपहरण करून विवस्त्र करत केली मारहाण

पोलिसांनी पाच जणांवर दाखल केला गुन्हा

मुलुंडच्या व्यावसायिकाचे अपहरण करून विवस्त्र करत केली मारहाण

मुलुंड पूर्व येथील पॅरिस गारमेंट स्टोर्सच्या मालकाचे अपहरण करून येऊर येथील एका बंगल्यात आणून निर्वस्त्र करून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली आहे.याप्रकरणी ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संपत्तीच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.

बिपीन लालजी कारिया (४१) असे या व्यवसायिकाचे नाव आहे. बिपीन कारिया हे मुलुंड पूर्व येथे राहण्यास असून एल.टी. रोडवर त्यांचे पॅरिस गारमेंट नावाचे कपड्याचे दुकान आहे. बिपीन कारिया हे २२ मे रोजी नाशिक येथे कुटुंबियांसह स्वतःच्या मोटारीने गेले होते, तेथून परतत असताना शहापूर जवळ त्यांना चुलत भाऊ नितीन फरीया याचा कॉल आला. त्याने कारिया यांना ठाण्यातील कोरम मॉल जवळ भेटण्यासाठी बोलावले. बिपीन कारिया हे घरी न जाता ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथे मोकळ्या जागेत उभी करून चुलत भाऊ फरीया याला फोनवरून आपण तिथे आल्याचे सांगितले.

काही वेळातच फरीया त्या ठिकाणी मोटार सायकल वरून आला. त्याच्या पाठोपाठ एक इनोव्हा मोटार येऊन थांबली. त्या मोटारीतून दुसरा चुलत भाऊ रसिक बोरीचा आणि एक अनोळखी व्यक्ती बाहेर आले. रसिक याने कारियाला तुझ्यासोबत बोलायचे आहे, असे सांगून तू आमच्या सोबत आमच्या मोटारीतून चल तुझ्या कुटुंबाला माझा ड्रायव्हर घरी सोडून येईल असे सांगून ड्रायव्हरला चावी देण्यास सांगितली.

कारिया याला बळजबरीने इनोव्हा मोटारीत बसवून त्याच्या जवळील मोबाईल फोन काढून घेत मोटार थेट येऊन येथील एका बंगल्याजवळ उभी केली. रसिक बोरीचा याने “तू माझ्या सासऱ्याला कॉल का केला होता” असे बोलून कारियाला मारहाण करण्यास सुरुवात केली. बंगल्यात असलेल्या इतर दोघांनी कारियाला विवस्त्र करून लाथाबुक्यांनी, बांबूने मारहाण करण्यास सुरुवात केली.

एकाने करियाला मारहाण करतानाचा व्हिडिओ बनवला. कारिया यांनी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी व जीव वाचवण्यासाठी अपहरणकर्ते चुलत भाऊ यांच्याकडे माफी मागून स्वतःची सुटका करून घेत घर गाठले. झालेला सर्व प्रकार त्याने पत्नीला सांगितला व वर्तक नगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. मात्र अपहरणकर्ते कारियाचे चुलत भाऊ यांनी त्यांना फोन करून पोलीस तक्रार केली तर जीवे ठार मारू अशी धमकी दिल्यामुळे कारियाने घाबरून तक्रार दिली नव्हती.

हे ही वाचा:

संसद भवनाच्या उद्घाटनाविरोधातली याचिका फेटाळत न्यायालयाने ओढले ताशेरे

त्याने तब्बल ९४ हजार एमपीएससी हॉल तिकिटे हॅक केली! 

‘१ जूनपासून वीजबिल भरू नका’ : कर्नाटकच्या भाजप खासदाराचे आवाहन

इंग्रजांनी बांधलेल्या जुन्या संसद भवनाचे काय होणार?

अखेर गुरुवारी दुपारी कारिया हा वर्तक नगर पोलीस ठाण्यात दाखल झाला व त्याने तक्रार दाखल केली. वर्तक नगर पोलिसानी नितीन फरीया, रसिक बोरीचा, अनिल फरीया यांच्यासह बंगल्यात असलेले दोघे अनोळखी असे एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Exit mobile version