मुंबई पोलिसांनी गँगस्टर सुरेश पुजारीला केली अटक

मुंबई पोलिसांनी गँगस्टर सुरेश पुजारीला केली अटक

मुंबईतील एका व्यवसायिकाला ठार मारण्याची धमकी देऊन ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई खंडणी विरोधी पथकाने गँगस्टर सुरेश पुजारीला अटक केली आहे. २०१८ मध्ये हा गुन्हा घडला होता त्यावेळी पुजारीचा सहा गुंडांना अटक करण्यात आली होती, त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र देखील दाखल करण्यात आले आहे.

गँगस्टर सुरेश पुजारी याला फिलिपाईन्स येथे अटक करण्यात आली होती. तेथील पोलिसांनी गेल्या महिन्यात पुजारीला भारताच्या ताब्यात देण्यात आले होते. केंद्रीय तपास यंत्रणेने सुरेश पुजारीला दिल्ली विमानतालावरून ताब्यात घेऊन महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात दिले होते. ठाणे एटीएसने सुरेश पुजारीला ठाण्यातील गुन्ह्यात अटक केली होती.

सुरेश पुजारी याची एटीएस कोठडी संपताच त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. दरम्यान मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने २०१८ च्या एका गंभीर गुन्हयात सुरेश पुजारीचा ताबा मागण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने पुजारीचा ताबा मुंबई खंडणी विरोधी पथकाला दिल्यानंतर गुरुवारी सुरेश पुजारीला खंडणी विरोधी पथकाने खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

हे ही वाचा:

गोवन फिश करी विथ रायता

स्थायी समितीत बोलू न दिल्याच्या निषेधार्थ भाजपा सदस्यांचे धरणे आंदोलन

लखनऊमध्ये लव्ह जिहादच्या प्रकारानंतर खळबळ; यासिनने केला पत्नी शिवाचा खून

ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे विद्यार्थिनीवर अत्याचार….त्यातून संपवले जीवन

 

२०१८ मध्ये सुरेश पुजारीने मुंबईतील एका व्यवसायिकाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. दरम्यान पुजारीच्या गुंडांनी या व्यवसायिकाच्या कार्यालय जवळ गोळीबार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुरेश पुजारीच्या ४ गुंडांना शस्त्रासह अटक करण्यात आली होती. या गुन्हयात सुरेश पुजारी हा फरार आरोपी होता अखेर गुरुवारी त्याला या गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version