‘माझ्या माणसांनी बँकेतून घेतलेले कर्ज माफ कर, अन्यथा एका कोटी दे’ या आशयाचा धमकी गँगस्टर सुरेश पुजारी याने एका पतपेढीच्या अध्यक्षाला दिल्याचा प्रकार उल्हासनगर येथे समोर आला आहे. गँगस्टर सुरेश पुजारी हा परदेशात असून रवी पुजारीच्या अटकेनंतर त्याने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील व्यवसायिकामधे भीतीचे वातावरण पसरले आहे. या धमकी प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी सुरेश पुजारी आणि त्याच्या अन्य चार साथीदारा विरुद्ध गुन्हा खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास ठाणे गुन्हे शाखा करीत आहे.
हे ही वाचा:
अजून चार राफेल भारतात दाखल होणार
पब्लिक सब जानती है…देवेंद्र फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र
ठाकरे सरकारचे दीड हजार रुपये अजून लोक शोधत आहेत
कोरोना चाचण्यांच्या आकडेवारीचा फुगा फुटला
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर नंबर २ नालंदा पॅलेस या इमारतीत राहणारे व्यवसायिक अमित वाधवा हे कल्पतरू को.ऑप.क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष आहेत. मागील काही महिन्यापासून वाधवा यांना परदेशातून धमकीचे फोन येत आहे. फोन करणारी व्यक्ती स्वतःला गँगस्टर सुरेश पुजारी असल्याचे सांगून ‘एक कोटीची खंडणी अथवा माझ्या माणसांनी तुझ्या पतपेढीतून घेतलेले कर्ज माफ कर’ या अशी धमकी देत आहे. वाधवा यांनी प्रथम याकडे दुर्लक्ष केले मात्र फोन सतत येत असल्यामुळे घाबरून वाधवा यांनी ठाणे गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. गुन्हे शाखेकडून हा तपास मध्यवर्ती गुन्हे शाखेकडे सोपवला. मध्यवर्ती गुन्हे शाखेने याप्रकरणी अमित वाधवा यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.
गुन्हे शाखेच्या तपासात वाधवा यांच्या पतपेढीतून रोशन माखीजा, उमेश राजपाल, पंकज तिलोकानी, सुशील उदासी यांनी लाखो रुपयांचे कर्ज घेतले आहे. हे कर्ज माफ व्हावे म्हणून त्यांनी गँगस्टर सुरेश पुजारी यांच्यामार्फत वाधवा यांना कर्ज माफ करण्यासाठी धमकी देण्यास सांगितले अशी माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेने या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून हा फोन सुरेश पुजारी हा करीत आहे का त्याच्यानावाने दुसरी व्यक्ती फोन करीत आहे याचा तपास सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेने डोईली आहे.
कोण आहे सुरेश पुजारी
रवी पुजारीच्या अटकेनंतर भूमिगत झालेल्या गँगस्टर सुरेश पुजारी याने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांची दिली आहे. सुरेश पुजारी हा घाटकोपर येथे राहात असला तरी त्याचे अनेक काळ्या धंद्याची सुरुवात उल्हासनगर येथून झाली आहे. व्हिडिओ गेम, जुगाराचा अड्डा चालवणाऱ्या सुरेश पुजारीने ठाणे जिल्ह्यातून गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला. येथील बेकायदेशीर धंद्यावाल्याकडून वसुली करणे, खंडणी उकळले यासारखे गुन्हे करता करता त्याने अपहरण, खून, खुनाचा प्रयत्न या सारखे गंभीर गुन्हे करू लागला. ठाणे जिल्ह्यात सुरेश पुजारी याने आपली दहशत निर्माण केली होती. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण येथून त्याने आपले गुंड तयार करून स्वतःची गॅंग तयार केली. पोलिसांना ससेमिरा मागे लागताच सुरेश पुजारीने भारतातून पलायन करून परदेशात दडून बसला. परदेशात बसून तो आपली टोळी चालवू लागला होता. सुरेश पुजारीच्या अनेक गुंडाची पोलीसानी धरपकड सुरु केल्यानंतर घाबरलेल्या सुरेश पुजारीने रवी पुजारीशी हात मिळवणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र रवी पुजारीने त्याला दूर करत सुरेश पुजारीच्या बालेकिल्ल्यावर कब्जा केला होता. रवी पुजारीच्या अटकेनंतर सुरेश पुजारीने पुन्हा एकदा ठाण्यात डोके वर काढण्यास सुरुवात केल्यामुळे व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.