पंजाबी गायक आणि राजकारणी सिधू मुसेवाला याच्या हत्येतील सूत्रधार कुख्यात गुंड गोल्डी ब्रार याने ‘सलमान खानला आम्ही मारूच. त्याचे नाव आमच्या यादीत आहे,’ अशी दर्पोक्ती केली आहे. कॅनडास्थित फरार गँगस्टर गोल्डी ब्रार याने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन हा खळबळजनक दावा केला. काही महिन्यांपूर्वीच सलमान खान याने त्याच्या सहकाऱ्याला धमकीचे ई-मेल मिळत असल्याने पोलिसात तक्रार दाखल केली होती. सिधू मुसेवाला याची गेल्या वर्षी हत्या झाली होती.
‘आम्ही त्याला ठार मारू. नक्कीच ठार मारू. भाई सहाब (लॉरेन्स) ने म्हटले होते की, त्याने माफी मागितली नाही. बाबा तेव्हाच दया दाखवतात, जेव्हा त्याला समोरच्याची दया येते,’ असे ब्रार या मुलाखतीत सांगतो आहे. या मुलाखतीत त्याने सध्या तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा उल्लेख केला आहे. त्याने एका मुलाखतीत सलमान खान याला ठार मारणे हे आपले जीवनाचे ध्येय असल्याचे म्हटले होते. ‘आम्ही आधीच सांगितल्याप्रमाणे हे केवळ सलमान खानपुरते सीमित नाही. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, आम्ही आमच्या शत्रूंना ठार मारण्याचे प्रयत्न सातत्याने करतच राहू. सलमान खान आमचे लक्ष्य आहे, यात कोणतीही शंका नाही. आम्ही प्रयत्न करत राहू आणि जेव्हा आम्ही यात यशस्वी होऊ, तेव्हा तुम्हाला कळेलच,’ असे गोल्डी ब्रार म्हणाला.
हे ही वाचा:
१५ ऑक्टोबरला भारत पाकिस्तान भिडणार
क्रिकेट सामन्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या पोलीस बंदोबस्ताच्या रक्कमेत कपात
केसीआर पक्षातल्या ३५ जणांनी धरला काँग्रेसचा हात
कंपासमधील ब्लेडने दर्शनावर वार नंतर दगडाने मारहाण
मार्च महिन्यात सलमान खान याला धमकीचे ई-मेल पाठवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या विरोधात मार्चमध्ये गुन्हा दाखल केला होता. हा ई-मेल सलमान याचा जवळचा सहकारी प्रशांत गुंजाळकर याला पाठवण्यात आला होता. त्यात त्याने लॉरेन्स बिश्नोईच्या मुलाखतीचा दाखला गेत सलमान खान याच्याशी बोलायचे असल्याचे म्हटले होते. ‘गोल्डी ब्रार याला तुझ्या बॉसशी (सलमान खान) बोलायचे आहे. त्याने (बिश्नोईची) मुलाखत पाहिलीच असेल. आणि जर पाहिली नसेल, तर त्याला बघायला सांग. जर त्याला हे प्रकरण इथेच संपवायचे असेल, तर त्याला सांग (गोल्डी ब्रार)शी बोल. जर त्याला समोरासमोर बोलायचे असेल, तर तसे आम्हाला कळव. यावेळी आम्ही तुला वेळेवर कळवले आहे. पुढच्या वेळी केवळ तुला धक्काच बसेल,’ असे या ईमेलमध्ये म्हटले होते.
या ईमेलनंतर सलमान खान याच्या टीमने पोलिस ठाण्यात रोहित गर्ग आणि गँगस्टर गोल्डी ब्रार व लॉरेन्स बिश्नोई याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. गेल्या वर्षी कॅनडातील पहिल्या २५ फरार गँगस्टरच्या यादीमध्ये गोल्डी ब्रार याचे नाव होते.