31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामागँगस्टर गोल्डी ब्रारला केंद्राने दहशतवादी म्हणून केले घोषित!

गँगस्टर गोल्डी ब्रारला केंद्राने दहशतवादी म्हणून केले घोषित!

देशाच्या सुरक्षेला धोका असणाऱ्या यादीत सुमारे २८ गुंडांची नावे

Google News Follow

Related

कॅनडामध्ये राहून भारतात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या गँगस्टर गोल्डी ब्रारवर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. त्याला बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. दहशतवादी गोल्डी हा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा उजवा हात असल्याचे बोलले जाते.पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आरोपी गोल्डी ब्रार असल्याचे मानले जाते.आरोपी गोल्डी ब्रारच्या सांगण्यावरून बिष्णोई टोळीच्या कार्यकर्त्यांनी गायक मुसेवालाची हत्या करण्यात आली होती.

गँगस्टर गोल्डी ब्रारचे खरे नाव सतींदर सिंग उर्फ ​​सतींदर सिंगजीत सिंग आहे. तो भारतातून पळून २०२१ मध्ये कॅनडाला पोहोचला. तेव्हापासून तो कधी कॅनडा तर कधी अमेरिकेत राहून गुन्हेगारी व दहशतवादी कारवाया करत आहे. तेथून तो एका मॉड्यूलच्या माध्यमातून पंजाबमध्ये गुन्हे करतो. केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत तो बब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा:

मोदीच येणार! द गार्डीयनचाही दावा

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपान भूकंपाच्या धक्क्याने हादरलं!

बाबरीचे पक्षकार अंसारी म्हणतात, पंतप्रधान मोदींनी अयोध्येचे रुपडे पालटले!

इस्रोकडून भारतीयांना नव्या वर्षाची भेट; XPoSAT चे यशस्वी प्रक्षेपण!

मिळालेल्या माहितीनुसार, गँगस्टरमधून दहशतवादी घोषित झालेला गोल्डी ब्रार हा पंजाबच्या श्री मुक्तसर साहेब येथील रहिवासी आहे. त्याचा जन्म ११ एप्रिल १९९४ रोजी झाला. सध्या तो कॅनडातील ब्रॅम्प्टन येथे राहत आहे.तेथे तो खलिस्तानी दहशतवाद्यांशी मिसळून भारताविरुद्ध काम करत आहे. कॅनडामध्ये बसून त्याने पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा संपूर्ण कट रचला होता. यानंतर त्याने सोशल मीडियावर हत्येची घोषणा करून याची जबाबदारीही स्वीकारली होती.

केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएने तपासणी करत परदेशातून भारताविरुद्ध चालवल्या जाणाऱ्या दहशतवादी टोळ्यांची एक यादी तयार केली.या यादीत सुमारे २८ मोठ्या कुख्यात गुंडांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत, ज्यांच्यापासून देशाच्या सुरक्षेला धोका आहे.ही यादी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सोपवण्यात आली आहे. हे गुंड पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थानसह अनेक राज्यांत मोठमोठे गुन्हे घडवत आहेत. एवढेच नाही तर ते देशविरोधी कारवायांमध्येही सहभागी आहेत.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा