27.5 C
Mumbai
Saturday, March 1, 2025
घरक्राईमनामादाऊद टोळीचा गुंड प्रकाश हिंगु तब्बल २९ वर्षांनी सापडला!

दाऊद टोळीचा गुंड प्रकाश हिंगु तब्बल २९ वर्षांनी सापडला!

न्यायालयात वारंवार गैरहजर राहिल्यामुळे फरार घोषित करण्यात आले होते

Google News Follow

Related

आर्थर रोड तुरुंगात दाऊद टोळी आणि छोटा राजन टोळीत झालेल्या गँगवार मधील दाऊद टोळीचा फरार गँगस्टर प्रकाश रतिलाल हिंगू (६३) याला २९ वर्षांनी कर्नाटक राज्यातील हुबळी येथून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई एन.एम.जोशी मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ देशमाने यांनी केली आहे.

प्रकाश रतिलाल हिंगू हा दाऊद टोळीचा सराईत गुंड असून मागील २९ वर्षांपासून तो स्वतःची ओळख लपवून कर्नाटकातील हुबळी येथे राहत होता. मूळचा मुंबईतील अंधेरी पश्चिम जुहू लेन येथील एका चाळीत राहणारा प्रकाश हिंगु हा एकेकाळी दाऊद टोळीत सक्रिय गँगस्टर होता. १९९६ मध्ये प्रकाश हिंगु याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली होती. या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्याची आणि दाऊदच्या इतर गुंडांची आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.

हे ही वाचा:

देशाची अर्थव्यवस्था ६.३ ते ६.८ टक्के दराने वाढणार

अभिभाषणानंतर सोनिया, राहुल यांच्याकडून राष्ट्रपतींची खिल्ली!

यंदाचा अर्थसंकल्प नवा आत्मविश्वास, ऊर्जा देईल!

शिवलिंगावर पाय ठेवून रील बनवणाऱ्या इम्रानला अटक!

या दरम्यान, आर्थर रोड तुरुंगात छोटा राजन टोळीचे अनेक गुंड होते. १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊद आणि छोटा राजनमध्ये दरी निर्माण झाली होती. त्यावेळी छोटा राजनने दाऊदला संपविण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून दाऊद आणि छोटा राजनमध्ये वैर निर्माण झाले होते. याचे पडसाद १९९६ मध्ये आर्थर रोड तुरुंगात उमटले होते. दाऊद टोळीचे गुंड आणि छोटा राजन टोळीचे गुंड तुरुंगात एकमेकासमोर येताच त्यांच्यात गँगवार पेटले होते. दोन्ही टोळ्यांकडून एकमेकाच्या गुंडावर हल्ले करण्यात आले होते. याप्रकरणी ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दोन्ही टोळीच्या गुंडावर परस्परांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

दाऊद टोळीवर दाखल झालेल्या गुन्ह्यात प्रकाश रतिलाल हिंगू याचे आरोपी म्हणून नाव होते. त्याला अटक करण्यात आली होती. हिंगु याला न्यायालयाने जामिनावर सोडल्यानंतर तो फरार झाला होता. खटल्यादरम्यान, प्रकाश हिंगू वारंवार न्यायालयात हजर राहण्यात अयशस्वी ठरल्याने माननीय न्यायालयाने त्याला फरारी घोषित करण्यात आले होते. हिंगु याचा शोध घेण्यात आला मात्र तो सापडत नव्हता. दरम्यान २९ वर्षांनी एका गुप्त माहितीदाराकडून हिंगु हा कर्नाटक येथे लपून बसला असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ देशमाने आणि त्यांच्या पथकाला मिळाली असता पोलिस पथकाने हुबळी येथे जाऊन प्रकाश हिंगुला अटक करण्यात आली. पोलिसांनी आज त्याला यशस्वीरित्या पकडले आणि १९९६ च्या गुन्ह्यात त्याला औपचारिकरित्या पुन्हा अटक करण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
231,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा