गँगस्टर लॉरेंस बिश्नोईची कबुली
गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. गँगस्टर लॉरेंस बिश्नोई याने आपला गुन्हा कबूल केला आहे. लॉरेंस बिश्नोईने दिल्ली पोलिसांना दिलेल्या जबाबात असे सांगितले की, आपणच गायक सिद्धू मुसेवालाची हत्या केली. कारण त्याने माझा भाऊ विक्की मिद्दुखेडा याची हत्या केली होती. या कारणामुळेच मी त्याचे हत्याकांड घडवून आणले. माझ्या गँगने हा बदला घेतला आहे.
लॉरेंस यांनी सांगितले की, हे कृत्य माझे नाही. मी तिहार तुरुंगात असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. बातम्यांवरून गायक मुसेवालाच्या हत्येची माहिती मिळाली. सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेंस बिश्नोई या टोळीचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. सध्या तो तिहार तुरुंगात बंद आहे. २८ वर्षीय पंजाबी गायक मुसेवाला याची रविवारी मनसा जिल्ह्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
हे ही वाचा:
भाजपा-शिवसेनेच्या उमेदवारांत सहाव्या जागेसाठी चुरस निश्चित
‘ज्वलंत हिंदुत्वाचे प्रवक्ते औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवणाऱ्या टिकैत यांचा निषेध करतील का?’
राष्ट्रवादी काँग्रेसचे PFI शी साटेलोटे
या घटनेनंतर बिश्नोई याने दिल्लीच्या पटियाला कोर्टात याचिका दाखल करून सुरक्षेची मागणी केली आहे. याचिकेत लिहिले आहे की, तो विद्यार्थी नेता असून, राजकीय वैमनस्यमुळे त्याच्यावर पंजाब आणि चंदीगडमध्ये अनेक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आपल्या जीवाला धोका असून खोट्या चकमकीत मारले जाण्याची भीती व्यक्त केली आहे, अशी मागणी त्याने न्यायालयाकडे केली आहे.