अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, आठ जणांना अटक

पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, आठ जणांना अटक

पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. एक दिवस मुलीला एका बंगल्यामध्ये बंद करून तिच्यावर अत्याचार केला आहे. याप्रकरणी सातपाटी पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून आठही आरोपीना पोलिसांनी गजाआड केले आहे.

गुरुवार रात्रीपासून मुलगी बेपत्ता असल्याने तिच्या वडिलांनी सातपाटी पोलिसांत तक्रार केली. पिडीत मुलीला संपर्क केला असता ती मुलगी फक्त रडत होती, असं तिह्च्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तपास सुरु केला आणि पोलिसांनी मुलीला हरणवाडी गावातून ताब्यात घेतले.

त्यानंतर पिडीत मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. पिडीत मुलीला माहीम समुद्रकिनारी नेऊन एका बंगल्यात आळीपाळीने तिच्यावर आठ नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीच्या जबाबानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३७६,डी, ए ३७६,(३)३६६ए ,३४१,३४२,३२३,५०४,५०५ सह पॉक्सो ऍक्ट ४,६,८,आणि १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:

कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा, काँग्रेसला मळमळ

आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु

मेस्सीचे वर्ल्डकपमध्ये अनेक विक्रम; एकाच स्पर्धेत सर्व फेऱ्यांत गोल नोंदविणारा एकमेव खेळाडू

हळद हसली, उत्पादन वाढले

पुढे पोलीस गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल विभुते तसेच सातपाटी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रेमनाथ ढोले यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करून शनिवारी पहाटेपर्यंत सर्व आरोपींना गजाआड केले. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पडवी करत आहेत.

दरम्यान, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी याप्रकरणी ट्विट केले आहे. १७ डिसेंबरला पोलिसांनी गुन्हा दाखल करून १८ डिसेंबरला आठ आरोपींना अटक केली. या नराधमांना अटक केली आहेच त्यांना शिक्षासुद्धा होईल. पण पालकांनी अशा घटना घडू नये म्हणून आपल्या पाल्याकडे लक्ष ठेवणे खूप गरजेच असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

Exit mobile version