26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरक्राईमनामा'पुष्पक एक्सप्रेस' मध्ये दरोडा आणि सामूहिक बलात्कार

‘पुष्पक एक्सप्रेस’ मध्ये दरोडा आणि सामूहिक बलात्कार

Google News Follow

Related

महाराष्ट्रातले महिला अत्याचाराचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस मध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना पुढे आली आहे. लखनऊ येथून मुंबईच्या दिशेने येणारी पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी ते कसारा या स्थानकांदरम्यान असताना हा धक्कादायक प्रकार घडला. लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणात कारवाई सुरू केली असून आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबईकडे येणाऱ्या ‘पुष्पक एक्सप्रेस’ च्या एका बोगीत इगतपुरी ते कसारा स्थानकाच्या दरम्यान आठ जणांच्या टोळीने दरोडा टाकून एका २० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री उशिरा उघडकीस आली. या घटनेत दरोडेखोर सुमारे ९६ हजारांची लूट करून पसार झाले. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात दरोडा, विनयभंग, आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी रात्रीतून कल्याण लोहमार्ग आणि गुन्हे शाखेच्या पथकाने कसारा येथून दोन दरोडेखोरांना अटक केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (लोहमार्ग) मनोज पाटील यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी होणार राजकीय उड्डाण?

सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाचे धाडसत्र सुरूच

वसुली म्हटली की ‘ससा’ आणि शेतकऱ्यांना मदत म्हटल्यावर ‘कासव’…असे हे ठाकरे सरकार!

चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीवर एनसीबीचे छापे! हजर राहण्याचे समन्स

लखनौ येथून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेस शुक्रवारी काही तास उशिराने धावत होती. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्थानकात आली असता सी-१ या बोगीत काही शस्त्रधारी इसम शिरले. इगतपुरी रेल्वे स्थानकातून एक्स्प्रेस सुटताच या शस्त्रधारी दरोडेखोरांनी बोगीतील प्रवाश्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटपाट सुरू केली. बोगीत दरोडा पडल्याच्या भीतीने प्रवाश्यांमध्ये एकच गोंधळ उडला. गोंधळलेल्या प्रवाश्यांनी आरडाओरडा सुरू केला. काही प्रवासी आसनाखाली तर काहींनी शौचालयात स्वतःला कोंडून घेतले होते.

बोगीत घुसलेल्या आठ दरोडेखोरांनी महिला प्रवासी आणि इतर प्रवाश्यांच्या अंगावरील दागिने खेचण्यास सुरुवात केली. अनेकांच्या बॅगा उचकटून त्यातील मौल्यवान वस्तू चोरी केल्या. एवढ्यावर न थांबता या दरोडेखोरांपैकी काही दरोडेखोर बोगीतून प्रवास करणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीकडे गेले. या नराधमांनी तिची छेड काढायला सुरूवात केली. तिचे कपडे उतरवून तिच्यासोबत अश्लील चाळे करून तिच्यासोबत दरोडेखोरांनी सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केला.

इगतपुरी ते कसारा दरम्यान सुरू असणाऱ्या या भयानक प्रकारामुळे पुष्पक एक्सप्रेसमधील सर्वच प्रवासी भयभीत झाले होते. कसारा स्थानकात एक्स्प्रेस शिरण्यापूर्वीच हे दरोडेखोर धीम्या झालेल्या गाडीतून उड्या टाकून अंधारात पसार झाले.
कल्याण लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी सामूहिक बलात्कार, विनयभंग, दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर या टोळीतील दोन दरोडेखोरांना कसारा येथून अटकही करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा