विसर्जन सोहळ्यात मोबाईल चोरणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

भाविकांच्या गळ्यातील सोनसाखळ्या, मोबाईल लांबवले होते

विसर्जन सोहळ्यात मोबाईल चोरणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणाऱ्या  ७ जणांना अटक करण्यात आली असून त्याच्या जवळून चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

काळाचौकी, व्ही.पी.रोड,डी.बी.रोड पोलिस ठाण्यांची ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेले मोबाईल चोर, मुंब्रा,शिवाजी नगर, आंबिवली परिसरात राहणारे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक शुक्रवारी लालबाग येथून  निघाली होती. ज्या मार्गाने ही मिरवणूक गेली, त्या मार्गावर गर्दीत अनेकांचे मोबाईल फोन आणि सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी काळाचौकी  व्ही.पी.रोड,डी.बी.रोड पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्या तपास करण्यासाठी पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीचे व्हिडीओ , तसेच त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून  मोबाईल चोराचा शोध घेऊन त्यांना विविध परिसातून अटक करण्यात आली आहे. या चोरट्याकडून पोलिसांनी चोरीचे काही मोबाईल जप्त केले असून अधिक अधिक तपास सुरु आहे.

हे ही वाचा:

लघु शंकेमुळे येते दीर्घ शंका

दादर, प्रभादेवीत का होतोय राडा?

मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ जाहीर

ज्ञानवापी मशिदीत हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार अबाधित

अनंत चतुर्थीचा मुहूर्त साधत परराज्यातून आलेल्या मोबाईल चोराच्या टोळ्यांनी शुक्रवारी गणेश विसर्जन मिरवणुकांना आपले लक्ष्य केले. या टोळ्यांनी लालबाग, परळ, गिरगाव सह पूर्व – पश्चिम उपनगर, उत्तर मुंबईतील गणेश विसर्जन मिरवणुकाच्या गर्दीत मिसळून अनेकांचे मोबाईल फोन आणि सोनसाखळ्या लांबवल्या. एकट्या लालबाग परिसरातून या टोळ्यांनी मोठ्या प्रमाणात मोबाईल आणि सोनसाखळी चोरी केल्याचे समोर आले आहे.

शुक्रवारी दुपारपासून काळाचौकी पोलीस ठाण्यात चोरीच्या तक्रारी दाखल करण्यासाठी अनेकांची रीघ लागली आहे. शनिवारी दुपारपर्यंत काळाचौकी पोलीस ठाण्यात ५० पेक्षा अधिक मोबाईल फोन आणि २० पेक्षा अधिक सोनसाखळी चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत.

Exit mobile version