सध्या सगळीकडे त ऑनलाइन खरेदीवर अधिक भर आहे. पण तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केली कि फी देण्यास येणार डिलिव्हरी बॉय खरंच आहे कि तुम्हाला लुटण्यासाठी आला आहे. याच खातरजमा करून घ्या. डिलिव्हरी बॉयच्या वेशात येऊन लुण्याचे प्रकार मुंबई आणि आसपासच्या भागात घडत आहेत. त्यामुळे दार काळजीपूर्वक उघडा. अन्यथा…
मुंबईसह ठाणे जिल्ह्यात झोमॅटो आणि स्विगी डिलिव्हरी बॉईजचे टी-शर्ट घालून दरोडेखोरांची टोळी शहरात धुमाकूळ घालत आहे. ठाण्यात या टोळीकडून घरफोडी आणि डिलिव्हरीच्या नावाखाली लुटमारीच्या दोन घटना घडल्या आहेत. ठाण्याच्या नौपाडा आणि भिवंडी शहरात या घटना घडल्या असून संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झोमॅटो डिलिव्हरी बॉईजचे टी-शर्ट घातलेल्या तिघांनी भिवंडी शहरातील बेसिन कॅथोलिक सहकारी बँकेतून ११.७५ लाख रुपयांची रोकड लुटली. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून त्यांच्याकडून झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे टी-शर्ट आणि लुटलेली रोकड जप्त करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस; सर्वसामान्यांचे हाल
आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचे ‘अशुद्ध’ ट्विट व्हायरल
टिपू सुलतानाचा पुतळा बसवला तर बाबरी ढाचा सारखी अवस्था करू
ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रसूतीच्या निमित्ताने स्विगी डिलिव्हरी बॉईजचे टी-शर्ट घातलेल्या दरोडेखोरांनी घरात घुसून महिलेला बेदम मारहाण करून घरातील काही साहित्य लुटण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. या घटनांमुळे दुपारी एकट्या राहणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.