धक्कादायक! वापरलेले तेल पुन्हा विकले जात आहे रस्त्यावरील खाद्यपदार्थ बनविण्यासाठी

धक्कादायक! वापरलेले तेल पुन्हा विकले जात आहे रस्त्यावरील खाद्यपदार्थ बनविण्यासाठी

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसआय) धारावी परिसरात छापे टाकले असता पुनर्वापर केलेल्या तेलाची विक्री करणारे रॅकेट समोर आले आहे. हातगाडी, स्टॉलधारक आणि छोट्या रेस्टॉरंटकडून असे खाद्य तेल विकले जात असल्याचा संशय असून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. अन्नपदार्थ विक्रेत्यांकडून तेल जमा करून साबण/ बायोडिझेल कंपन्यांना तेल पुरविणाऱ्या धारावीतील दोन कंपन्यांवर एफएसएसआयने छापा टाकला असता तिथे जमा केलेले तेल नव्हते आणि साबण/ बायोडिझेल कंपन्यांना तेल पोहचत नसल्याचे उघड झाले.

नियमानुसार दिवसाला ५० लिटर तेलाचा वापर करणाऱ्या अन्नविक्रेत्यांना तीन वेळाच खाद्यतेलाचा वापर करता येतो. हा वापर झाल्यावर तेलाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी ते तेल साबण/ बायोडिझेल तयार करणाऱ्या कंपन्यांना देणे बंधनकारक असते. ५० लिटरपेक्षा कमी तेलाचा वापर करणाऱ्या अन्नविक्रेत्यांनी हे तेल खाण्यात येऊ नये याची खबरदारी घेणे बंधनकारक आहे. याच नियमांचे पालन होते का याची तपासणी करण्यासाठी एफएसएसआयकडून २ ते १७ सप्टेंबरदरम्यान एक मोहीम राबविण्यात आली होती. तेव्हा ही बाब समोर आल्याचे एफएसएसआयचे उपसंचालक (सेन्ट्रल) डॉ. के. यु. मेथेकर यांनी सांगितले.

हे ही वाचा:

आयपीएलचा पुनःश्च हरी ओम

पंजाबच्या मुख्यमंत्री पदासाठी सोनीयांची सोनींना पसंती?

‘उद्धवजी, अनैसर्गिक आघाडी केल्याचे आता लक्षात येत असेल ना?’

मोदींचा चेहरा आणि शिवसेनेतील फाटके मुखवटे

एफएसएसआयने केलेल्या कारवाईनुसार केएफसीकडून धारावीतील मे. नूर कंपनीला, तर बर्गर किंगकडून मे. केएनजी कंपनीला तीनदा वापरलेले तेल साबण/ बायोडिझेल कंपन्यांना देण्यासाठी दिले जात होते, पण हे तेल साबण/ बायोडिझेल कंपन्यांपर्यंत पोहचलेच नाही. जमा केलेले हे तेल रस्त्यावरील चायनिजवाले, हातगाडी, स्टॉलधारक यांना विकले जात असल्याची शंका एफएसएसआयला असून त्यानुसार आता पुढील कारवाई केली जाणार आहे.

खाद्यतेलाचा वापर तीनदाच करता येतो त्यानंतर ते खाण्यायोग्य राहत नाही. अल्झायमर, हृदयरोग, हायपरटेन्शन अशा आजारांचा धोका अशा तेलाचा वापर केल्यामुळे वाढतो. त्यामुळे अन्नपदार्थांची विक्री करताना आणि ग्राहकांनी ते खरेदी करताना योग्य काळजी घ्यावी असे आवाहन एफएसएसआयने केले आहे.

Exit mobile version