लसीकरण बोगस की बेकायदेशीर ? पाच जणांना अटक

लसीकरण बोगस की बेकायदेशीर ? पाच जणांना अटक

मुंबईतल्या एका उच्चभ्रू सोसायटीत झालेल्या लसीकरणाचा वाद थेट पोलीस ठाण्याकडे गेला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे लसीकरण बेकायदेशीर ठरवण्यात आले होते, असे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि याप्रकरणात आयोजकासह पाच जणांना अटक देखील करण्यात आली आहे. मात्र रहिवाश्यांना देण्यात आलेली ‘लस’ कसली होती याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. कांदिवली पश्चिमेतील एस.व्ही रोड येथील या घटनेमुळे रहिवाश्यामध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

कांदिवली एस.व्ही रोड या ठिकाणी असलेल्या हिरानंदानी हेरिटेज क्लब या उच्चभ्रू सोसायटीत ३० जून रोजी १८ वर्षांपासून पुढील वयोगटासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती. प्रत्येकी १,२६० रुपये मोजून सोसायटीतील ३९० रहिवाश्यांनी लस टोचून घेतली होती. मात्र लसीकरनाचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे रहिवाश्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि त्याचवेळी वेगवेगळ्या वैद्यकीय संस्थेचे लसीकरणाचे प्रमाणपत्र रहिवाश्यांना मिळाले होते. त्यात देखील चुका आढळून आल्या आणि हे प्रकरण कांदिवली पोलीस ठाण्याकडे गेले.

हे ही वाचा:
रस्ते अपघातांचे प्रमाण २०२४ पर्यंत ५० टक्क्यांवर आणणार

पुत्र व्हावा ऐसा गुंड!

मनसुखच्या डायटम रिपोर्टमुळे नवा संशय

गांजा विकायला तरुणीने सोडली इंजिनिअरिंगची नोकरी

कांदिवली पोलिसांनी अधिक माहिती मिळवली असता ही लसीकरण मोहीम बेकायदेशीर होती असे चौकशीत समोर आले. कांदिवली पोलिसांनी फसवणूक, बोगस दस्तऐवज याप्रकरणी गुन्हा दाखल करून आयोजक महेंद्र सिंह, चंदन सिंह, नितीन मोडे आणि करीम अकबर अली आणि संजय पांडे याला अटक करण्यात आली.

महेश सिंह याचे शिक्षण दहावी पर्यत झालेले असले तरी तो मागील १७ वर्षांपासून मेडिकल असोसिएशनचा सभासद आहे. त्याने आता पर्यत ९ ठिकाणी या प्रकारे लसीकरण मोहीम राबवली आहे. संजय पांडे हा सोसायटीतील लसीकरण मोहीम राबवण्यासाठी उच्चभ्रू सोसायटी यांना संपर्क साधून लसीकरण मोहीम ठरवतो. तर महेंद्र हा या मोहिमेचा मास्टरमाइंड आहे. चंदन सिंह आणि नितीन मोडे हे रुग्णालयात कामाला असून ते रुग्णालयाचा डाटा चोरी करून बोगस प्रमाणपत्र बनवण्याचे काम करीत होती. तर पाचवा आरोपीची जवाबदारी लस मिळवण्याची असते.

हे पाच जण मिळून लसीकरण कॅम्प लावून महानगर पालिकेला कुठल्याही प्रकारची सूचना न देता तसेच परवानगी न काढता लसीकरण कॅम्प भरवता अशी माहिती समोर आली आहे. लसीकरण तर बेकायदेशीर आहे मात्र रहिवाश्यांना टोचलेली लस कसली होती याबाबत अद्याप उलगडा झालेला नाही.

Exit mobile version