रेल्वेमध्ये तिकीट तपासणीसाची नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक

रेल्वेमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखों रुपयांची फसवणूक

रेल्वेमध्ये तिकीट तपासणीसाची नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक

स्पर्धा परीक्षेच्या युगात अभ्यास करून स्वबळावर अधिकारी होण्याच्या काळात आयती स्वप्न बघणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. अशातच मुंबई येथील विक्रोळी भागात एक घटना घडली आहे. यामध्ये रेल्वे विभागात तिकीट तपासणीसाची म्हणजेच टीसी या पदाकरीता नोकरी देण्याचे आमिष दाखवून ठगाणे व्यक्तीकडून तीन लाख रुपये घेत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेत पार्कसाईट पोलिस घटनेविषयी अधिक तपास करत आहेत.

तक्रारकर्ते धनश्री (४९) या विक्रोळी पश्चिमेकडील पार्क साईट भागात कुटुंबासोबत राहतात. डिसेंबर २०२० मध्ये पतीचा मित्र घरी आला असता, त्याने आपण रेल्वेमध्ये कंत्राटी तत्वावर ‘हाऊस कीपिंग’ची नोकरी करत असल्याचे धनश्री यांना संगीतले. धनश्री यांनी आपल्या मुलासाठी रेल्वेमध्ये नोकरी मिळू शकते का? अशी विचारणा केली. त्यावर त्यांच्या ओळखीच्या सुरेश आसारी यांची रेल्वेमध्ये चांगली ओळख असून तो मुलाला रेल्वेमध्ये नोकरी लावून देवू असे सांगितले.

हे ही वाचा:

नवरात्री २०२२ : विशालाक्षी शक्तीपीठ

उद्धव ठाकरे ‘या’ प्रश्नांची उत्तरं दसरा मेळाव्यात मिळतील का?

अफगाणिस्तानात शैक्षणिक संस्थेत स्फोट; ४६ मुलींसह ५३ ठार

पोलीस महासंचालकांच्या हत्येची पीएएफएफ दहशतवादी संघटनेने घेतली जबाबदारी

रेल्वेमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी १० लाख रुपये भरावे लागतील असे आसारी यांनी धनश्री यांना संगीतले. ठरल्याप्रमाणे धनश्री यांनी ३ लाख पाच हजार रुपये आसारी याला दिले. धनश्री यांचा विश्वास बसावा म्हणून रेल्वे रिक्रूटमेन्ट बोर्डाचे खोटे व बनावट नियुक्तीपत्र दिले. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर धनश्री यांच्या मुलाने मुळाखतीची तयारी करण्यास सुरुवात केली. परंतु मुलाखतीचा दिवस जवळ आला तरी ना मुलाखतीसाठी घेऊन गेले ना धनश्री यांनी भरलेले पैसे परत केले.

Exit mobile version