पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत २० लाखांची फसवणूक!

रायगड पोलिसांकडून सहा आरोपींना अटक

पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत २० लाखांची फसवणूक!

रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.नार्कोटिक्स विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगून एका कंपनीची तब्बल २० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.रायगड जिल्ह्यातील खोपोली तालुक्यात हा प्रकार घडला.या प्रकरणी रायगड पोलिसांनी गुजरातच्या अनेक भागातून सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खोपोली तालुक्यातील मुळगाव इथल्या इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजी इंडीया लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापकांना अज्ञात व्यक्तींकडून काल (१२ जून) सकाळी एक कॉल आला होता.कॉलरने कंपनीच्या व्यवस्थापकांना सांगितले की, कुरियरने येणाऱ्या तुमच्या मालामध्ये काही एलएसडी या अमली पदार्थांच्या ७० स्ट्रिप्स मिळाल्या आहेत आणि यामध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारात आपल्या कंपनीचा देखील बँक डिटेल्स आहेत.यासाठी कॉलरने कंपनीकडून पैशाची मागणी केली.त्यानंतर कंपनीकडून तब्बल १९ लाख ८९ हजार ५५ रुपये देण्यात आले.मात्र, आपली फसवणूक झाल्याचे जेव्हा कंपनीच्या लक्षात आले, त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

हे ही वाचा:

मुबिना युसूफकडून हिंदू मुलीवर धर्मांतर करून तिच्या मुस्लिम मित्राशी लग्न करण्यासाठी दबाव!

३०० कोटींच्या मालमत्तेसाठी सासऱ्याची हत्या; मारेकऱ्यांना एक कोटीची सुपारी!

हत्या करण्यासाठी फॅन क्लबच्या सदस्याचा वापर!

संत, धर्माचार्यांकडून ओम प्रमाणपत्राला भक्कम समर्थन, मोहीमेला दिले शुभ आशीर्वाद

दरम्यान, रायगड पोलिसांकडून पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या नेतृत्वाखाली या घटनेचा शोध लावण्यात आला.या प्रकरणात एकूण ६ आरोपी असल्याचं निदर्शनात आल्यानंतर या आरोपींना सुरत, गांधीनगर, अहमदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल ९ लाख ९७ हजार आणि १६ मोबाइल सेल फोन जप्त करण्यात आले आहे.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Exit mobile version