सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून तब्बल ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावातील वनविभागाअंतर्गत येणारी ५०० एकर जमीन नावावर करतो असे सांगत तब्बल दोघांची ८० लाख रुपयांची फसवणूक केली आहे.या प्रकरणी आरोपी ड्रायव्हरला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
सुनील धुमाळ असे आरोपीचे नाव आहे.तो तो मूळचा सातारा जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या कोपर खैरणे, नवी मुंबई येथे राहतो.आरोपी सुनीलने सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत दोघांची ८० लाखांची फसवणूक केली आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सांगितले की, २०२२ एप्रिल-मे दरम्यानच्या कालावधीत आरोपी सुनील धुमाळ हा सीबीआयमध्ये (बेलापूर) कंत्राटी पद्धतीवर ड्रायव्हर म्हणून कामास होता.काही काळाने कंत्राटी कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर आरोपी येथून निघून गेला.मात्र, आरोपीने बाहेर पडल्यानंतर सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत फसवणूक करायला सुरुवात केली.
हे ही वाचा:
मुस्लिम मुलाने हिंदू मुलीशी केलेला विवाह मुस्लीम कायद्यानुसार वैध नाही
बोरिवलीत सव्वा कोटीचे ‘हेरॉईन’ जप्त; दोघांना अटक
मेक्सिको आणि तुर्कीमध्ये इस्रायली दूतावासांवर हल्ले
मणिशंकर अय्यर आपल्या क्षमतेप्रमाणे हवे ते बोलतात…काँग्रेसने हात झटकले
ते पुढे म्हणाले, प्रसाद घोरपडे आणि त्याचा एक मित्र जैन हे दोघेही कसबा बावडा, कोल्हापूर येथील रहिवासी आहेत.आरोपीने सीबीडी येथील बचत भवन कार्यालय या ठिकाणी या दोघांची भेट घेतली अन सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले.कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावातील वनविभागाअंतर्गत येणाऱ्या ५०० एकरची जागा दोघांच्या नावावर करतो अशी बतावणी आरोपीने केली.
वनविभागाची बनावट एनओसी देखील त्याने दोघांना दाखवली.तसेच मुंबईतील दिंडोशी कोर्टामधून तशी एक बनावट ऑर्डर देखील बनविली.ही दोन्ही कागदपत्रे दाखवून दोघांचा विश्वास संपादन केला आणि दोघांकडून आरोपीने तब्बल ८० रक्कम घेतली, असे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी आरोपी सुनील धुमाळला अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरु आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.