बनावट मॅरेथॉन आयोजनाने स्पर्धक खवळले, आयोजकानेच केली आत्महत्या

बनावट मॅरेथॉन आयोजनाने स्पर्धक खवळले, आयोजकानेच केली आत्महत्या

कोल्हापूर येथे १६ ऑक्टोबरला आयोजित केलेल्या एका अर्ध मॅरेथॉनच्या संयोजकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या मॅरेथॉनचे संयोजक वैभव पाटील याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

मराठा कमांडो अर्ध मॅरेथॉन या स्पर्धेचे आयोजन वैभव पाटीलने केले होते. एमसीएसएफ वेल्फेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. पण त्यासाठी पैसे घेतले गेल्यानंतर प्रत्यक्ष शर्यतीचे आयोजनच झाले नाही. विजेत्यांना ३० लाखांपर्यंतची बक्षिसे होती. २१, १०, ५ आणि ३ किमी अशा विविध अंतरांसाठी ही मॅरेथॉन होती. २१ किमीसाठी १ लाख २१ हजार, दुसऱ्या क्रमांकासाठी ९० हजार, तिसऱ्यासाठी ७५ हजार, १० किमीसाठी ७५ हजार, दुसरे बक्षीस ५० हजार तर तिसरे २५ हजार, ५ किमीसाठी २० हजार, १५ आणि ११ हजार तर ३ किमीसाठी ११ हजार, ९ हजार आणि ८ हजार अशी बक्षिसे होती. ३ किमीसाठी ८०० रुपये, ५ किमीसाठी ९०० रुपये, १० किमीसाठी १२०० रु. आणि २१ किमीसाठी १८०० रु. त्यात २१ किमीला १३०० रुपये सवलतीच्या दरातही प्रवेश देण्यात येत होता.

रोख रक्कम, ट्रॉफी, भेटवस्तू, सन्मानचिन्ह, नाव रजिस्टर करण्यासाठी कोडही देण्यात आला होता. प्रायोजक किंवा कुण्या कंपनी वगैरेचे नाव नव्हते. अनेक राज्यांतील स्पर्धकांनी भाग घेतला होता. पण कुणालाही नंबर मिळाले नाहीत, कोणतीही माहिती देण्यात येत नव्हती. आयोजकही कुठे दिसत नव्हते. त्यामुळे लोक खवळले. त्यामुळे वैभव पाटीलने पळ काढला. मात्र नंतर त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. १६ ऑक्टोबरला पहाटे ही शर्यत होणार होती. यासाठी जवळपास २ हजार स्पर्धक कोल्हापूरात दाखल झाले होते.

हे ही वाचा:

पाकिस्तानातले मृतदेह आणि कारस्थानाची दुर्गंधी

बाळासाहेबांच्या शिवसेनेतील ‘हा’ आमदार म्हणतो अंधेरी निवडणूक बिनविरोध करा

अमली पदार्थ घेऊन भारतीय हद्दीत ड्रोन घुसले

अणूरणनीतीचा आविष्कार

 

सकाळी ९.३०च्या सुमारास पाटील याने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. त्यानंतर पोलिस पथके रवाना झाली. त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे. या संयोजकांत आणखी कोण होते. याचा तपास केला जात आहे.

शाहुनगरीत हा प्रकार घडला. तपोवान येथून या शर्यतीचे आयोजन होणार होते. दीड हजार स्पर्धक कोल्हापुरात दाखल झाले. त्यांची फसवणूक झाल्याने संयोजकाने आत्महत्येचे पाऊल उचलले. मुंबई दिल्ली बिहार आसाम मधून खेळाडू आले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर इच्छुक स्पर्धकांच्या रागाचा उद्रेक झाला. या स्पर्धकांनी राहण्यासाठी तिथे लॉज, हॉटेल्स बुक केली होती. काहीजणांना  टीशर्ट आणि चीप उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले पण नंबर मिळू शकले नाहीत.

Exit mobile version