मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या गणवेशातील फोटोचा दुरुपयोग केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. एका व्हाट्सअप क्रमांकावरून पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचा पोलिस गणवेशातील फोटो डीपीवर ठेवण्यात आला आहे. या क्रमांकावरून मुंबईसोबतच मुंबईच्या बाहेरील नागिरकांना मेसेज पाठवण्यात येत आहे.
त्या क्रमांकावर मेसेजमध्ये ‘अमेझॉन पे ई- गिफ्ट विथ दहा हजार व्हॅल्यू’ ची मागणी करून ते गिफ्ट लवकरात लवकर देण्याची विनंती करीत आहे. पोलीस आयुक्तांचा फोटो डीपीमध्ये वापरल्याने लोकांनी त्या मेसेजला भुलू नये यासाठी पोलिसांनी लोकांना सूचना दिल्या आहेत. या मेसेजला कोणीही बळी पडू नये. त्या क्रमांकासोबत कुठलाही व्यवहार करू नये अथवा या मेसेजला प्रतिसाद देऊ नये अशी विनंती मुंबई पोलीसांकडून करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
गुलाम आझाद यांचा काँग्रेसला रामराम, स्थापन करणार नवा पक्ष
हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या संभाजी ब्रिगेडशी शिवसेनेची युती
मुंबई पोलिसांच्या ट्राफिक कंट्रोल रूमला पुन्हा आला मेसेज
भाजपाकडून मढ येथील अनधिकृत स्टुडिओची पाहणी
दरम्यान, मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रुमला २० ऑगस्ट रोजी धमकीचा मेसेज आला होता. २६/११ सारखा भयानक हल्ला पुन्हा एकदा करणार असल्याची धमकी या मेसेजमधून देण्यात आली होती. कंट्रोल रुमच्या नंबरवर भारताच्या बाहेरील क्रमांकावरून मेसेज आले असून हे धमकीवजा मेसेजेस पाकिस्तानमधून आल्याचे म्हटले जात होते. यामुळे पोलिसांनी सर्वांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.