एका सामाजिक संस्थेच्या नावावर कर्णबधीर नागरिकांना गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे चित्रपटात दाखवतात त्या प्रमाणे ठरावीक दिवसात दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून कर्णबधीरांकडून कोट्यावधी रूपये लाटण्यात आले आहेत. तब्बल साडे तीनशे जणांकडून सात करोड रूपये लुटण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. २०१८ ते २०२१ या तीन वर्षांच्या कलावधीत या घटना घडल्या आहेत.
या फसवणुकीच्या घटनांमध्ये तीन जणांची टोळी सक्रिय आहे. हे तीघे जण कर्णबधीर नागरिकांसाठी एक सामाजिक संस्था चालवत असल्याचे सांगतात. त्या संस्थेशी संबंधीत वेगवेगळी कागदपत्रे सादर करतात. त्यानंतर एका ठेव योजनेची माहिती देतात. ज्या अंतर्गत ४५ दिवसात ठेवीदाराचे पैसे दुप्पट होतील असे सांगण्यात येते. भोळे भाबडे नागरिक या फसवणूकीला बळी पडतात. नागरिकांनी पैसै गुंतवल्यावर त्यांना पैसै दिले जात नाहीत.
हे ही वाचा:
अनिल परबांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे अर्धशतक!
धनंजय मुंडेंनी लुटला जगमित्र साखर कारखाना
करण जोहरच्या पार्टीमध्ये सहभागी ठाकरे सरकारमधील मंत्री?
पैशांच्या संदर्भात विचारणा केली असता या कर्णबधीर गुंतवणूकदारांना मारहाण करण्याच्या आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. देशभरातील विविध राज्यातून हा फसवणूकीचा प्रकार घडताना दिसला आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, कोलकाता, केरळ, पंजाब अशा विविध राज्यांचा समावेश आहे. तर या संदर्भात अंधेरी, डोंबिवली येथील पोलिस स्थानात तक्रार दाखल करण्यात आली आहे.