हज यात्रेला स्वस्तात पाठविण्याचे आमीष दाखविणारा पोलिसांच्या तावडीत

हज यात्रेला स्वस्तात पाठविण्याचे आमीष दाखविणारा पोलिसांच्या तावडीत

यात्रेकरू आणि गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या मुख्य संचालकाला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने कल्याणमधून अटक केली आहे. नासीर अब्दुल शकूर शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याचे अन्य तीन साथीदार फरार आहेत. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली आहे. यांनी तब्बल २ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

शेख आणि अन्य तीन साथीदारांनी अल हरम इंटरनॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीमार्फत यात्रेकरूंना हज यात्रेला आणि उमरा येथे स्वस्त दरात पाठविण्याचे आमिष दाखवले. दोन वर्षे आधी बुकिंग केल्यास ५० टक्के सवलत दिली जात होती. सन २०१९ पर्यंत यात्रेकरूंना पाठविण्यात येत होते. नंतर मात्र नागरिकांना यात्रेला पाठवले जात नव्हते.

हे ही वाचा:

सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाचे धाडसत्र सुरूच

चिपी विमानतळावरून महाविकास आघाडीचे ‘चीप’ राजकारण

‘बेस्ट’चे चालक आता भाड्याने मिळणार!

कोरोना योद्ध्यांना ठाकरे सरकार कधी ‘सन्मान’ देणार?

त्यानंतर शेख आणि त्याच्या साथीदारांनी सुहाना फेश प्रायव्हेट लि. आणि हलाल ऍग्रोटेक प्रायव्हेट लि. या गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या सुरू केल्या. ग्राहकांना चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले होते. मात्र, मुदत संपल्यावरही ग्राहकांना मुद्दल परतावा मिळाला नसल्यामुळे कल्याणमधील जावेद कादीर शेख यांनी तक्रार केली होती.

त्यानंतर कंपनीचा मुख्य संचालक शेख याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास ठाणे आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. सुमारे १५० जणांची २ कोटी ७० लाख ९ हजार ४७० रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

 

Exit mobile version