जितेंद्र आव्हाडांविरोधात चौथे आरोपपत्र, करमुसे मारहाण प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार असल्याचा दावा

ठाणे शहर पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केले पुरवणी आरोपपत्र दाखल

जितेंद्र आव्हाडांविरोधात चौथे आरोपपत्र, करमुसे मारहाण प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार असल्याचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. अनंत करमुसे मारहाण प्रकरणात आता चौथे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यात आणखी अनेक गोष्टींचा अंतर्भाव केल्यामुळे या मारहाण प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार जितेंद्र आव्हाडच होते असा दावा त्यातून करण्यात आला असल्याचे कळते.

अनंत करमुसे यांनी शेअर केलेल्या एका पोस्टवरून हे प्रकरण घडले होते. करमुसे यांना आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण करण्यात आली होती. आव्हाड यांच्या अंगरक्षकांनी करमुसे यांना त्यांच्या घरातून या बंगल्यावर नेले आणि तिथे त्यांना मरेस्तोवर मारहाण करण्यात आली.

ठाणे शहर पोलिसांनी ५०० पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले असून त्यात आव्हाड यांच्याविरोधात आणखी काही गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारदार करमुसे हे उच्च न्यायालयात गेले आणि नंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ठाणे पोलिसांकडून तपासात अनेक त्रुटी राहिल्याचे स्पष्ट केले. २४ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाने ठाणे पोलिसांना निर्देश दिले की, या प्रकरणाचा पुन्हा तपास करावा.

हे ही वाचा:

बेशिस्त चालकांची आता धडगत नाही; आरटीओ इंटरसेप्टरची संख्या होणार पाचपट

एक्स्प्रेस वेवर १७ महिन्यांत ३५ वाहनांना आग

परस्पर विश्वास, आदर हे भारत-ऑस्ट्रेलिया दृढ संबंधांचे सूत्र

निवडणूक लढवल्याबद्दल १० वर्षांपूर्वी नोकरीवरून काढलेल्या परिचारिकेला दिलासा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याआधीचे जे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते त्यात आव्हाड यांचा या प्रकरणात अल्प सहभाग असल्याचे दाखविण्यात आले होते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांनी त्यातील त्रुटी दूर करून आता नव्याने पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे आव्हाड यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत. करमुसे यांनी आव्हाड यांच्यासंदर्भात शेअर केलेल्या पोस्टनंतर त्यांना ही मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणानंतर आव्हाड यांना वाचविण्याचा प्रयत्न तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता.

Exit mobile version