29 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरक्राईमनामागोवंडीत तरुणीवरील सामुहिक बलात्काराच्या घटनेमुळे संताप

गोवंडीत तरुणीवरील सामुहिक बलात्काराच्या घटनेमुळे संताप

Google News Follow

Related

कॅटरिंग कामावरून पहाटेच्या सुमारास घरी परतणाऱ्या एका तरुणीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना गोवंडीतील शिवाजी नगर येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोघांचा कसून शोध घेण्यात येत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गोवंडी शिवाजी नगर येथे राहणारी पीडित तरुणी १९ वर्षाची आहे. शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी ही कॅटरिंग चे काम करून घरी जात असताना रोड नंबर १३ या ठिकाणी एका तरुणाने तिची वाट अडवून एवढ्या रात्री कुठे निघालीस असे बोलून ‘चल तेरे साथ बात करनी है,’ असे बोलून तीला घेऊन तो एका घराच्या माळ्यावर घेऊन गेला. त्या ठिकाणी अगोदरच तिघेजण होते, या चौघांनी मिळून तिचे तोंड दाबून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

हे ही वाचा:

बीडमध्ये चोरांचा सुळसुळाट… भाजप नेत्याच्या शिपायालाच लुटले

काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणतात, मुंबईच्या खराब परिस्थितीला शिवसेना जबाबदार

नागपुरात नग्न नृत्याचा ‘हंगामा डान्स’

राजपथवर धावणार महाराष्ट्राचा चित्ररथ

 

पीडित तरुणीने या चौघांच्या तावडीतून सुटका करून घेत पोलिसांना कॉल केला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तत्पूर्वीच आरोपींनी तेथून पळ काढला होता. पोलिसांनी पीडित तरुणीचा जबाब नोंदवून सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी ४ पथके तयार करून ठाणे, नवी मुंबई परिसरात आरोपीचा शोध घेत दोघांना अटक करण्यात आली असून दोघांचा कसून शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा