अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्यामुळे देवनार पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणे, तिला डोळा मारणे आणि आमिष दाखवून जवळ बोलावणे अशा गुन्हांची नोंद करत पोलिसांनी २८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. विशेष पोक्सो न्यायालयाने या तरुणाला चार वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
तरूणाविरोधात १२ वर्षीय मुलीच्या आईने ६ मार्च २०१७ रोजी देवनार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. ‘मुलगी दूध आणण्यासाठी घराबाहेर गेली असताना, आरोपीने तिला डोळा मारला आणि तिचा पाठलागही केला. तसेच तिला शंभर रुपयांची नोट दाखवून सोबत येण्यास सांगितले. तेव्हा मुलगी घाबरून घरी पळून आली आणि तिने घडलेली हकीकत मला सांगितली. त्यानंतर मी ही घटना माझ्या पतीला सांगितली. पूर्वीही या तरुणाने मुलीचा पाठलाग केला होता.’ असे तरुणीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी या तक्रारीवरून मजूर म्हणून काम करणाऱ्या तरुणाला अटक केली.
हे ही वाचा:
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे तिसरे पुण्यस्मरण
भारताच्या स्वातंत्र्य दिनी लंडनमध्ये मोदी विरोधाची उचकी
जलतरण तलाव कधी होणार ‘कोरोनामुक्त’?
पीडित मुलीला खोटी साक्ष देण्यासाठी पाढवण्यात आल्याचे दाखवणारे कोणतेही पुरावे बचाव पक्षाकडून मांडलेले नाहीत. शिवाय मुलगी किंवा तिच्या कुटुंबीयांसोबत पूर्ववैमनस्य होते आणि तरुणाला या प्रकरणात गोवल्याचेही कोणते पुरावे सदर केलेले नाहीत. त्यामुळे पिडीत मुलीवर अविश्वास दाखवणारे कोणतेही कारण दिसत नाही.
आरोपीने पूर्वीही या मुलीचा पाठलाग केल्याचे पुराव्यावरून स्पष्ट झाले आहे. तसेच डोळा मारणे आणि आमिष दाखवून जवळ बोलावणे यामुळे मुलीचा विनयभंग केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे कलम ३५४- ड आणि ५०९ च्या अंतर्गत त्याला न्या. सीमा जाधव यांनी दोषी ठरवले. याप्रकरणात त्याने आतापर्यंत भोगलेल्या चार वर्षांच्या तुरुंगवासाची आणि आणखी तीन दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली.