करनालमधून चार संशयित दहशतवाद्यांना अटक

करनालमधून चार संशयित दहशतवाद्यांना अटक

हरियाणा करनाल येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत चार संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. हरियाणा पोलिसांनी कारवाई करत चार संशयितांना अटक केली आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात मोठा घातपात करण्याचा त्यांचा डाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या संशयित दहशतवाद्यांकडून अनेक स्फोटक वस्तू आणि पिस्तूलचे काडतुसे मिळाली आहेत.

हरियाणा पोलिसांनी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या संशयितांना मधुबन जवळून अटक केली. हे सर्व एका एसयूव्ही कारमधून प्रवास करत होते. कारमध्ये संशयास्पद पदार्थ आढळल्याने बॉम्ब नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर या चौघांकडून मोठ्या प्रमाणात पिस्तूलचे काडतुसे, गनपावडर कंटेनर अशा काही वस्तू जप्त करण्यात आल्या. त्यांच्याकडे मिळालेली एक पावडर ही RDX असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

या विषयांवर पंतप्रधान मोदींनी नॉर्डिक देशांशी केली चर्चा

या विषयांवर पंतप्रधान मोदींनी नॉर्डिक देशांशी केली चर्चा

कान्स चित्रपट महोत्सवात भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’

संदीप देशपांडे, संतोष धुरी विरोधात गुन्हा दाखल

अटक करण्यात आलेले चार संशयितांचे वय सुमारे २० ते २५ आहे. हे चारही आरोपी पंजाबमधून दिल्ली मार्गे महाराष्ट्रातील नांदेड येथे जात होते. हे संशियत पंजाबस्थित दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Exit mobile version