छत्तीसगडमधील सुकमा येथील नक्षली भागात तैनात असलेल्या एका सीआरपीएफ जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत चार जवानांना प्राण गमवावे लागले, तर तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. सुकमातील मराईगुडा ठाणा क्षेत्रातील सीआरपीएफ कॅम्पमध्ये ही गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये सीआरपीएफच्या ५० व्या बटालियनमधील चौघा जवानांचा मृत्यू झाला.
Chhattisgarh: Four jawans of CRPF 50 Bn killed and 3 injured in a case of fratricide in a CRPF camp in Maraiguda Police station limits of Sukma. A jawan had opened fire at the camp. pic.twitter.com/4ZF64RCNKM
— ANI (@ANI) November 8, 2021
राजधानी रायपूरपासून ४०० किमी अंतरावर असलेल्या लिंगमपल्ली गावात सीआरपीएफच्या ५० व्या बटालियनच्या कॅम्पमध्ये पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली, असे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितले.
हे ही वाचा:
रुग्णालयांमधील आगींच्या घटनेत दीड वर्षात गेले ५१ बळी
एनसीबीने गोठवली १२ कोटींची मालमत्ता
पंजाबमध्ये आता पेट्रोल ९५ तर डिझेल ८३ रु. महाराष्ट्र वाट पाहतोय!
सीआरपीएफ ५० व्या बटालियनचा जवान रात्रपाळीवर तैनात होता. त्याने मध्यरात्री अचानक कॅम्पमध्ये गोळीबार केला. त्यामुळे खळबळ माजली होती. कॅम्पमधीलच चार जवानांचा जागेवरच मृत्यू झाला, तर तीन जवान गंभीर जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जवानाने गोळीबार का केला? हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पण, सीआरपीएफकडून या घटनेची चौकशी केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, जवानाने त्याच्या एके-४७ रायफलमधून आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला.