पालघर साधू हत्येची पुनरावृत्ती टळली

उत्तर प्रदेशातील चार साधूंना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीत घडला आहे.

पालघर साधू हत्येची पुनरावृत्ती टळली

चार साधूंना सांगलीत बेदम मारहाण

उत्तर प्रदेशातील चार साधूंना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीत घडला आहे. मुले पळवणारी टोळी असल्याचा समाज झाल्याने या चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. जत तालुक्यातल्या लवंगा येथे ही घटना घडली. माहितीनुसार, हे चार साधू उत्तर प्रदेशचे असून ते कर्नाटक येथे देवदर्शनासाठी आले होते. तिथून ते लवंगा मार्गे विजापूर येथे जात होते तेव्हा ही घटना घडली.

उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथून चार साधू कर्नाटक येथे देवदर्शनाला आले होते. तिकडून ते लवंगामार्गे विजापूर येथे जात होते. यावेळी त्यांनी रस्त्यात एका विद्यार्थिनीला विजापूरला जाणारा रस्ता हाच का अशी विचारणा केली. त्यावेळी ही मुळे पळवणारी टोळी असल्याच्या समजुतीने काही लोकांनी या साधूंना बेदम मारहाण केली. त्यांना गाडीतून खेचून काढत बेल्ट आणि काठीने मारहाण केली.

यावेळी आपण साधू असल्याचे त्यांनी सांगूनही जमावाने त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही. शिवाय या साधुंनी ओळखपत्र आणि आधार कार्ड दाखवूनही जमावाने मारहाण सुरूच ठेवली. अखेर पोलिसांच्या मध्यस्तीने मारहाण थांबवण्यात आली. हे सर्व साधू वारकरी संप्रदायातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातल्या या पक्षांवर निवडणूक आयोगाची कारवाई

पाकिस्तान विरुद्धच्या विजयाचा आनंद श्रीलंकेपेक्षा अफगाणिस्तानला जास्त

अयोध्येतील राम मंदिरावर १८०० कोटी खर्च होणार

इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

गेल्या वर्षी दरोडेखोर असल्याचं समजून साधू आणि त्यांच्या चालकाला गावकऱ्यांनी मारहाण केली होती. यात साधूसह त्यांच्या चालकाचा मृत्यू झाला होता. त्यावेळीही साधूंनी ओळख सांगून देखील जमावाने त्यांना मारहाण केली आणि त्यात दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला होता.

Exit mobile version