भक्तांकडून दक्षिणा घेतल्याने तमिळनाडू पोलिसांकडून चार पुजाऱ्यांना अटक

भक्तांकडून दक्षिणा घेतल्याने तमिळनाडू पोलिसांकडून चार पुजाऱ्यांना अटक

देशाला स्वतंत्र होऊन ७७ वर्षे लोटली आहेत. भाजपचे सरकार इंग्रजांनी लादलेले अन्यायकारक कायदे बदलण्याचा प्रयत्न करते आहे. मात्र मंदिरांबाबतचे इंग्रजांनी लादलेले कायदे अजूनही लागू आहेत. इंग्रजांनी हिंदू मंदिरे व अन्य ठिकाणांना आपल्या निरीक्षणाखाली आणले होते. आता अशाच एका कायद्यामुळे तामिळनाडू पोलिसांनी चार पुजाऱ्यांना अटक केली आहे.

तमिळनाडूतील मेट्टुपलयमजवळील थेकमपट्टीमध्ये वाना बद्रकालियाम्मन मंदिराच्या चार पुजाऱ्यांना पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. भक्तांनी दिलेले दक्षिणारूपी पैसे बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. एका तक्रारीनंतर मंदिराच्या सहायक आयुक्तांनी चार पुजारी आणि विश्वस्त वसंत संपत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार तमिळनाडू पोलिसांनी चौकशी करून चारही पुजाऱ्यांना अटक केली. ३६ वर्षीय आर. रघुपती, ४७ वर्षीय एस दंडापाणि, ५४ वर्षांचे सरवनन आणि गोबिचेट्टिपलयमचे ३३ वर्षीय विष्णु कुमार अशी या पुजाऱ्यांची नावे आहेत. मंदिराचे विश्वस्त वसंत संपत फरार आहेत. हे चारही पुजारी भाविकांनी थाळीमध्ये ठेवलेल्या दक्षिणा घरी घेऊन जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

हे ही वाचा:

दिल्ली, नोएडातील ५० हून अधिक शाळांना बॉम्बची धमकी!

महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन: कथा अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करण्याची!

महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींचा षटकार!

कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारने रेवण्णावर का कारवाई केली नाही ?

मंदिरांच्या पुजाऱ्यांना दक्षिणेतून मिळालेले पैसे मंदिरातील दानपेट्यांमध्ये जमा करणे क्रमप्राप्त असते, असे हिंदू धार्मिक आणि धर्मार्थ विभागाचे सहायक आयुक्त आणि मंदिराचे कार्यकारी अधिकारी यूएस कैलासमूर्ती यांनी सांगितले. हा सरकारी आदेश असून मद्रास उच्च न्यायालयाने या प्रथेचे समर्थन केले आहे. तसेच, थाळीत मिळालेले संपूर्ण दान राजस्व निधी मानण्याचा आदेश दिला आहे, असे कैलासमूर्ती यांनी सांगितले. हे पुजारी थाळीत जमा झालेली दक्षिणा मंदिराच्या दानपेटीत जमा करत आहेत की नाहीत, हे पाहण्यासाठी मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version