32 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरक्राईमनामावेबसीरिज बघून बनावट पासची आयडिया सुचली, पण आता झाले गजाआड

वेबसीरिज बघून बनावट पासची आयडिया सुचली, पण आता झाले गजाआड

आमदाराच्या दांडियामध्ये बनावट पासची विक्री, चौघांना अटक

Google News Follow

Related

ज्या चित्रपट, वेबसीरिजमधून करमणूक होते त्यातून काहीजण वेगळाच अर्थ काढतात, काही जण त्यातून वेगळा मार्गही निवडतात. सध्या नवरात्रीच्या निमित्ताने गरब्याचे आयोजन केले जात आहे. त्याच्या पासेससाठी अनेकांची लगबग सुरू असते. त्याचा फायदा काही लोकांनी अचूक उचलला पण त्यांना नंतर त्याचे परिणाम भोगावे लागले.

आमदार सुनील राणे यांच्या गरब्याचे बनावट पास बनवून त्यांची विक्री करणाऱ्या चौकडीला पोलिसांनी अटक केली आहे. ‘फर्जी’ नावाच्या वेबसिरीज बघून बनावट पास तयार करून त्याची विक्री करण्याचे सुचले असल्याचे अटक करण्यात आलेल्या चौकडीपैकी मुख्य आरोपीने पोलिसांकडे कबुली दिली आहे. पोलिसांनी या चौकडीकडून बनावट पाससह ३६ लाखाचा ऐवज जप्त केला आहे.

 

करण अजय शाह (२९) , दर्शन प्रवीण गोहिल (२४) परेश सुरेश नेवरेकर (३५)कविष भालचंद्र पाटील (२४) असे अटक करण्यात आलेल्या चौकडीची नावे आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे विरार,कांदिवली आणि मालाड मनोरी या परिसरात राहणारे आहेत. भाजपचे आमदार सुनील राणे यांनी बोरिवली येथे रंगरात्री दांडिया नाईट्स सीझन२ चे आयोजन केले आहे. या दांडिया नाईट्सचे काही जणांनी बनावट पास तयार करून त्यांची विक्री करीत असल्याची तक्रार एमएचबी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.

हे ही वाचा:

गाझा पट्टीत दफनभूमीची जागा संपली; आईस्क्रीमच्या ट्रकमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ

ट्रकला आरटीओने महामार्गावर थांबवल्याचा व्हिडीओ समोर; दोन अधिकारी अटकेत

‘हिट अँड रन’ अपघातांतील मृतांपैकी फक्त २०५ जण भरपाईसाठी आले पुढे

उद्धव ठाकरे आता समाजवाद्यांच्या पंगतीत

या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू करून १२ तासात चार जणांना अटक केली. या चौकडीकडून सुमारे ३६लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली, त्यात बनावट पासेस तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि ३० लाख किमतीचे एक हजार बनावट पासेस चा समावेश आहे.

 

विरार येथे राहणारा करणं शाह हा या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असून तो ग्राफिक डिझायनर आहे, फर्जी’ नावाच्या वेबसिरीज बघून त्याला बनावट पास तयार करून त्याची विक्री करण्याची कल्पना सुचली आणि त्याने इतराना हाताशी घेऊन बोरिवली कांदिवलीतील सर्वात गर्दीचे ठिकाण असलेल्या गरब्याचे ठिकाण शोधून अखेरीस भाजपचे आमदार सुनील राणे यांनी बोरिवली येथे रंगरात्री दांडिया नाईट्स सीझन२ यांच्या दांडिया नाईट्स सिझन २चे बनावट पास बनवून त्यांची विक्री सुरू केली होती अशी माहिती तपासात समोर आली. या टोळीने आतापर्यत किती जणांना हे बनावट पासेस विकले या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा