अहमदनगरमध्ये एका उरुसात औरंगजेबाचे पोस्टर नाचविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अहमदनगर येथील फकीरवाडा भागात दर्ग्याच्या संदलचा कार्यक्रम झाला. त्यात एमआयएमचे शहराध्यक्ष सरफराज जागीदार यांच्यासह अनेकांनी औरंगजेबाचे फोटो नाचवत आनंद साजरा केला. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे असे प्रकार सहन करणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर औरंगजेबाचे फोटो नाचवणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील फकीरवाडा परिसरात ४ जूनच्या रात्री हजरत उंबाहारी हजरत यांच्या उरूस निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक मुकुंद नगर भागात पोहोचली तेव्हा काही लोकांनी औरंगजेबाचे पोस्टर नाचवायला सुरुवात केली. या डान्सचा व्हिडिओ ५ जून रोजी व्हायरल झाला होता. ५ जून रोजी पोलीस शिपाई सचिन नवनाथ धोंडे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी मोहम्मद सरफराज इब्राहिम सय्यद उर्फ सर्फराज जहागीरदार, अथनान आदिल शेख, शेख सरवर आणि जावेद शेख यांना अटक केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
हे ही वाचा:
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुरीनामच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित!
किल्ले रायगडावर शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण! अडीच लाख शिवभक्त जमले
३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकीट!
राज्यात औरंगजेबाचे नाव घेणाऱ्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.