मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर कार अपघातात चार विद्यार्थी गतप्राण

मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर कार अपघातात चार विद्यार्थी गतप्राण

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात घडला आहे. शनिवारी, ९ एप्रिलला दुपारी ट्रकचा आणि कारचा भीषण अपघात झाला असून चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कार मुंबईच्या दिशेने निघाली होती, या अपघातात चौघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

कार भरधाव वेगाने मुंबईच्या दिशेला निघाली होती. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही कार पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर गहुंजे गावात एक ट्रक कडेला उभा होता त्याला मागून धडकली. कारमध्ये चार महाविद्यालयीन विद्यार्थी होते त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. शिवम कोकाटे(१९), प्रियम राठी(२०), हृषीकेश शिंदे (२१) आणि मोहनीश विश्वकर्मा (२०) असे या मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. हृषीकेश शिंदे हा त्याच्या वडिलांची कार चालवत होता.

विशेष म्हणजे, अपघातात मृतुमुखी पडलेल्या विध्यार्थ्यांच्या पालकांना मुलांच्या योजनेबद्दल काहीच माहिती नव्हते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी जेव्हा या विध्यार्थ्यांच्या पालकांची संपर्क साधला तेव्हा त्यांच्या पालकांना याबद्दल काहीच कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत संशयास्पद असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाची अधिक चौकशी सुरु आहे.

हे ही वाचा:

हिमाचलमध्ये आप ला धक्का, प्रदेशाध्यक्षांसह तीन बडे नेते भाजपात

मनसेने थेट शिवसेना भवनाबाहेर लावली हनुमान चालीसा

‘श्रीरामांच्या आचार-विचारांचा जीवनात सर्वांनी अंगीकार करायला हवा’

पोलिसांना चुकविण्यासाठी गो तस्करांनी गाईंनाच गाडीतून फेकले

काही महिन्यांपूर्वी वर्ध्यात देखील असाच एक अपघात झाला होता. त्या अपघातात सात मेडिकल विध्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातात कार ४० फुट पुलावरून खाली पडल्याने विध्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाला होता.

Exit mobile version