जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात पुन्हा एकदा लष्कराचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाल्याचे वृत्त आहे. डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या अधिकाऱ्यासह चार सुरक्षा जवान हुतात्मा झाले आहेत. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.
जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील देसा जंगल परिसरात सोमवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह चार जवान हुतात्मा झाले आहेत. यानंतर घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले असून परिसरात सुरक्षा दलांकडून शोधमोहीम सुरू आहे. राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी सोमवारी संध्याकाळी ७:४५ वाजता देसा वन क्षेत्रातील धारी गोटे उरारबागी येथे संयुक्त घेराव आणि शोध मोहीम सुरू केली होती. यादरम्यान दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू झाली. मात्र, दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या अधिकाऱ्यासह चार जवानांचा मंगळवारी पहाटे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Four soldiers killed in action in encounter with terrorists in J-K's Doda
Read @ANI Story | https://t.co/BJ9OcCcPDh#JammuandKashmir #dodaencounter #IndianArmy pic.twitter.com/y6JhAH55t4
— ANI Digital (@ani_digital) July 16, 2024
राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी डोडा शहरापासून ५५ किमी अंतरावर लपलेल्या दहशतवाद्यांसाठी संयुक्त शोध मोहीम सुरू केली होती. त्यानंतर रात्री जवानांनी हल्ला केल्यानंतर चकमक सुरु झाली. २० मिनिटांपेक्षा जास्त काळ हा गोळीबार सुरू होता. दरम्यान, जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक होती आणि त्यापैकी चौघांचा आता मृत्यू झाला आहे, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर आता सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे.
हे ही वाचा:
मुंबईत विकासकामांना गती; पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेले प्रकल्प कोणते? काय होणार फायदा
यासिन भटकळ विशाळगडावर राहिला, हेच का तुमचे पुरोगामित्व?
‘कॅम्लिन’ उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा सुभाष दांडेकर यांचे निधन
आसाममध्ये ५० लाख बेकायदेशीर स्थलांतरितांना नागरिकत्व मिळेल हा दावा ठरला फोल
सुरक्षा दलांना या भागात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती याचं माहितीच्या आधारे, डोडाच्या उत्तरेकडील सामान्य भागात लष्कर आणि पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू होती. रात्री ९ वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांचे ठिकाण कळताच गोळाबीर सुरु करण्यात आला होता, असेही लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. ‘काश्मीर टायगर्स’ या जैश-ए-मोहम्मदची एक शाखा असलेल्या संघटनेने याची जबाबदारी घेतली आहे. याच संघटनेने कठुआ येथे लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.