गुजरात एटीएसच्या पथकाने अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. गुजरात एटीएसने सोमवार, २० मे रोजी चार श्रीलंकन नागरिकांना इस्लामिक स्टेट ऑफ इराक ऍण्ड सीरिया (आयएसआयएस) गटाशी संबंध असल्याबद्दल अटक केली आहे. हे दहशतवादी श्रीलंकेतून भारतात आल्याची माहिती मिळते आहे. हे दहशतवादी अहमदाबादला का आले होते? तिथे कोणाच्या संपर्कात होते का? याचा तपास सुरू आहे.
गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर इसिसच्या चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे सर्व श्रीलंकेचे नागरिक आहेत. संपूर्ण विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. केंद्रीय एजन्सीकडून काही गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे या चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अटक केलेले चौघेही मूळचे श्रीलंकेचे रहिवाशी आहेत. हे दहशतवादी अहमदाबादला का आले होते, तिथे कोणाच्या संपर्कात होते का? याचा तपास एटीएसकडून सुरु करण्यात आला आहे.
ऐन निवडणुकीच्या काळात ही कारवाई करण्यात आली आहे. शिवाय सध्या देशात आयपीएलचे सामने सुरू आहेत. या स्पर्धेचे क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्यांसाठी अहमदाबाद विमानतळावर तीन आयपीएल संघांचे आगमन होणार आहे. या आगमनापूर्वी ही अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपणार; तारीख ठरली
उपचारांसाठी भारतात आलेले बांगलादेशचे खासदार बेपत्ता
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरांतून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डर जप्त!
यापूर्वी, मार्चमध्ये भारतातील दोन वरिष्ठ इसिस नेत्यांना बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पकडण्यात आले होते. उत्तराखंडमधील डेहराडून येथील हरीश अजमल फारुकी आणि हरियाणातील पानिपत येथील अनुराग सिंग अशी या व्यक्तींची नावे होती. दोघेही मोठ्या प्रमाणावर दहशतवादी निधी आणि सुधारित स्फोटक उपकरणे (IEDs) वापरून दहशतवादी कृत्यांचे नियोजन करण्यात गुंतलेले होते. यापूर्वी अटक केलेल्या दोन इसिस नेत्यांवर नवी दिल्लीतील राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि लखनऊमधील एटीएसने त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल केले आहेत.