विक्रोळीतील पालिका शाळेतील चार विद्यार्थिनींवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार

चित्रा वाघ यांच्याकडून प्रकरणाची दखल

विक्रोळीतील पालिका शाळेतील चार विद्यार्थिनींवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार

मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळीमधील एका शाळेत धक्कादायक घटना घडली आहे. महानगरपालिकेच्या शाळेत चार मुलींवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना समोर येताच अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

विक्रोळीतील टागोर नगरमधील पब्लिक हायस्कूल या महापालिकेच्या शाळेतील पीटी शिक्षक सौरव उचाटे या शिक्षकाने दुसरी इयत्तेत शिकत असलेल्या चार विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शिक्षा देण्याच्या नावाखाली हा शिक्षक मुलींचा लैंगिक छळ करत असल्याची माहिती काही विद्यार्थिनींनी त्यांच्या पालकांना दिली होती. त्यांनतर पालकांनी या शिक्षकाला चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे. दरम्यान या शिक्षकाने ठाण्यातही असा अत्याचार केल्याची कबुली दिली आहे.

हे ही वाचा:

बस झाले! विश्वचषक २०२३च्या वेळापत्रकात आता बदल नाही

ब्रिटनमध्ये कबड्डी स्पर्धेत निघाल्या तलवारी, सुरे, लाठ्याकाठ्या

एकदम ‘बेस्ट’; ताफ्यात दाखल होणार २४०० इलेक्ट्रिक बसेस

चीनच्या मुद्द्यावर राऊतांनी मालकाची री ओढली

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. शाळेलाही त्यांची जबाबदारी झटकून देता येणार नाही. गेल्या एका महिन्यापासून हा शिक्षक शाळेत होता. त्याची पार्श्वभूमी तपासून पाहणे ही शाळेची जबाबदारी होती. त्यामुळे या प्रकरणात कोणाची चूक आहे याचा तपास पोलीस करत आहेत. पालकांच्या पाठीशी असून पोलीसही योग्य कारवाई करतील, असा विश्वास चित्रा वाघ यांनी दिला आहे. तसेच घडलेल्या प्रकरणानंतर पालक स्वतःहून पुढे आले याचेही त्यांनी कौतुक केले.

Exit mobile version