25 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025
घरक्राईमनामागोवंडीत आढळले एकाच कुटुंबातील चार मृतदेह

गोवंडीत आढळले एकाच कुटुंबातील चार मृतदेह

Google News Follow

Related

पत्नी मुलांसह आत्महत्या

मुंबईतील गोवंडींमधील शिवाजीनगर परिसरात चार जणांचे मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे एकाच कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह सापडले आहेत. पती, पत्नी आणि दोन मुलांचे हे मृतदेह असून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे. आधी मुलांना विष देऊन नंतर पती-पत्नीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे.

इंदिरानगर झोपडपट्टीत फैजाने मज्जिदच्या पाठीमागे, रोड नंबर १४, पदमा नगर चौकी समोरील झोपडपट्टी, बैंगनवाडी, शिवाजीनगर, गोवंडी इथं हे मृतदेह आढळले आहे. घरामध्ये हे मृतदेह होते आणि घराला आतून कडी लावली होती. प्रथम मुलांना विष देऊन मारण्यात आले आणि मग पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.

हे ही वाचा:

टॉप पाच आमदारांमध्ये अतुल भातखळकर

बाळासाहेबांचे नातू निहार ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने

“तरुण देशाचे तर भारत जगाच्या विकासाचे इंजिन”

पोलिसांच्या जीर्ण झालेल्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले हे आदेश

आत्महत्या केलेलं हे कुटुंब मुस्लिम आहे. शकील जलील खान (३४), रजिया शकील खान (२५), सरफराज शकील खान (७) आणि मुलगी अतिसा शकील खान(३) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. पोलिसांनी चौघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा