जीवरक्षकाला हुलकावणी देत जुहूकिनारी गेलेल्या ‘त्या’ चारही मुलांचे मृतदेह सापडले

बिपरजॉय वादळामुळे उंच लाटा आणि खवळलेल्या समुद्रामुळे झाले होते मृत्यू

जीवरक्षकाला हुलकावणी देत जुहूकिनारी गेलेल्या  ‘त्या’ चारही मुलांचे मृतदेह सापडले

जुहू समुद्रकिनारी सोमवारी दुपारी बुडालेल्या चारही किशोरवयीन मुलांचे मृतदेह मंगळवारी किनाऱ्यावर वाहून आले. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. धर्मेश फौजिया (१६), शुभम ओगानिया (१६), त्याचा धाकटा भाऊ मनीष ओगानिया (१६) आणि जय ताजभरिया (१६) अशी या मुलांची नावे आहेत.

 

हे चौघे आणि त्यांचा आणखी एक मित्र जीवरक्षकाच्या इशाऱ्याला न जुमानता जेट्टीच्या टोकाला गेले होते. तर, अन्य तिघे किनाऱ्यावर थांबले होते. समुद्राने उग्र रूप धारण केले असल्याने लाटांच्या तडाख्याने ही चार मुले समुद्रात ओढली गेली. ती चारही मुले बुडाली. तर, पाचव्याला स्थानिक मच्छिमाराने वाचवले. धर्मेशचा मृतदेह सोमवारी रात्रीच जुहू कोळीवाडा येथे स्थानिकांनी शोधून काढला, तर खराब हवामान आणि रात्रीच्या वाईट दृश्यमानतेमुळे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी रात्री ११ वाजता शोध मोहीम थांबवली होती. मंगळवारी सकाळी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर तीन जणांचे मृतदेह वाहून आले. पोलिसांनी त्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर एक फेरी मारून शोधमोहीम थांबवली.

हे ही वाचा:

सात महत्त्वाच्या शहरांमध्ये पुराचा धोका कमी करण्यासाठी अडीच हजार कोटींचे प्रकल्प उभारणार

क्रिकेटमधील सर्वात महाग चेंडू, एका चेंडूत १८ धावा दिल्या

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांवर झालेली भक्कम युती आहे!

रील बनवताना विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

‘आम्हाला पाण्याजवळ जायलाही मज्जाव होता, पण पर्यटक मात्र बिनधास्त फिरत होते. मग आमच्यापैकी काही जणांनी स्वतः शोध सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला,’ असे शुभमचे काका नरेश ओगानिया यांनी सांगितले. ‘आम्ही वर्सोव्याच्या किनाऱ्याची सुमारे साडेतीन वाजेपर्यंत पाहणी केली. नंतर कोळीवाड्याची पहाटे पाच वाजेपर्यंत पाहणी केली, परंतु काहीही सापडले नाही,’ असे ते म्हणाले.

 

स्थानिक मच्छीमारांना मंगळवारी सकाळी सात वाजता वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर शुभमचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. ‘माझा मुलगा गेला आणि तरीही पोलिस आम्हाला त्याच्या मृतदेहाला हात लावू देत नव्हते. मी भांडून शुभमला उचलले. त्याच्या डोक्यावर रक्त होतं,’ नरेश म्हणाले. शुभमचा धाकटा भाऊ मनीष याचा मृतदेह मंगळवारी दुपारी अडीच वाजता जवळच सापडला, असे स्थानिकांनी सांगितले.

Exit mobile version