26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरक्राईमनामाधक्कादायक! घुसखोर बांग्लादेशीनी मतदान केल्याचे आले समोर

धक्कादायक! घुसखोर बांग्लादेशीनी मतदान केल्याचे आले समोर

सुरतमधून बनावट पासपोर्ट मिळवले

Google News Follow

Related

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या एका घुसखोर बांगलादेशी नागरिकांसह चार जणांना एटीएसच्या पथकाने मुंबईतील विविध ठिकाणाहून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांकडे भारतीय पासपोर्ट मिळून आले असून हे पासपोर्ट गुजरात राज्यातील सुरत येथून बनवले असल्याचे समोर आले आहे.

एटीएसच्या जुहू कक्षाने गुप्त माहितीवरुन एका बांगलादेशी व्यक्तीला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली. त्यात बांगलादेशी व्यक्तींवर भारतात प्रवेश केल्याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने ते जामीनावर बाहेर पडतात. त्यानंतर ते बनावट कागदपत्राच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवून भारतात अवैध वास्तव करतात. तसेच, या पासपोर्टच्या मदतीने विदेशात नोकरी मिळवत असल्याचे उघड झाले.

एटीएसच्या जुहू कक्षाने याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आणखी तिघांना ताब्यात घेऊन अटक केली. अटक बांगलादेशी नागरिकांवर बेकायदेशीर रित्या भारतात वास्तव्य करत असल्याबाबत मुंबईत गुन्हे दाखल आहेत. त्यांनी सुरत, गुजरात येथे वास्तव्यास असल्याचे पुरावे मिळवून त्याआधारे त्यांनी सुरत, गुजरात येथुन पासपोर्ट मिळविल्याची माहिती एटीएस तपासात उघड झाली आहे.या पासपोर्टच्या आधारे अटक करण्यात आलेल्यापैकी एकाने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

अटक बांगलादेशींच्या आणखी पाच साथीदारांनीसुद्धा बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवले असून यातील एक आरोपी भारतीय पासपोर्टच्या आधारे सौदी अरेबिया येथे नोकरीसाठी गेला आहे. तसेच, काही बांगलादेशी आरोपींनी पासपोर्टच्या आधारे लोकसभा निवडणुक दरम्यान मतदान केल्याचे देखील एटीएसच्या तपासात समोर आले आहे. अटक आरोपींचा दहशतवादी कृत्यांशी काही संबंध आहे का, याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे एटीएसने सांगितले.

हे ही वाचा:

मोहन चरण माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री, १२ जूनला घेणार शपथ!

मलावीच्या उपराष्ट्रपतींचा विमान अपघातात मृत्यू!

मोहन चरण माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री, १२ जूनला घेणार शपथ!

“गेल्या ६० वर्षांत जे निर्णय घेतले गेले नाहीत ते नरेंद्र मोदींनी १० वर्षांत घेतले”

एटीएसने अटक केलेले चारही आरोपी हे बांगलादेशमधील नौखाली जिल्ह्यातील आहेत. यात हृदयनगरचा रहिवासी असलेला रियाज हुसेन शेख (३३) हा अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला, मिल्लतनगर येथे इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता. तर, सिनोदीचा रहिवासी असलेला सुलतान सिध्दीक शेख (५४) हा रिक्षाचालक असून तो मालाड, मालवणीतील अंबुजवाडीमध्ये रहातो. माहूल गावातील म्हाडा कॉलनीमध्ये वास्तव्यास असलेला इब्राहिम शफिउल्ला शेख (४६) हा भाजी विक्रेता असून तो बांगला देशातील साहेबर हाटचा रहिवासी आहे. तर, कबीर हाटचा रहिवासी फारूख उस्मानगणी शेख (३९) हा जोगेश्वरी पश्चिमेकडील गुलशन नगरमध्ये वास्तव्यास होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा