कुर्ला गोळीबार प्रकरणात ४ सुपारीबाज अटकेत

गाडीवर केला होता गोळीबार, गाडीचे नुकसानही केले होते

कुर्ला गोळीबार प्रकरणात ४ सुपारीबाज अटकेत

‘म्हाडा टेंडर’ प्रकरणात ठेकेदारावर गोळीबार करणाऱ्या चार सुपारीबाजाना भिवंडी येथील एका ढाब्यावरून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात ठेकेदाराची हत्या करण्याची सुपारी देणारी व सुपारी घेणारे दोघे असे एकूण चार जण फरार असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीसानी दिली.

सागर येरूणकर (२९), करण थोरात (२०), अभिषेक सावंत (२६) आणी विनोद कांबळी (२९) हे चौघे घाटकोपर पश्चिम येथे राहणारे आहेत. सागर येरूणकर हा मुख्य शूटर असून या चौघांना या कामासाठी १ लाख रुपयांची आगाऊ रक्कम देण्यात आली होती. तसेच उर्वरित रक्कम काम झाल्यावर मिळणार होती, मात्र या चौघांनी अद्याप ही रक्कम कोणी दिली याबाबत त्यांनी आपले तोंड उघडलेले नाही अशी माहिती चौकशीत पोलीस सूत्रांनी दिली.

समीर सावंत आणि गणेश चुक्कल हे दोघे अद्याप फरार असून या दोघांना काम देणाऱ्यांची नावे समोर आलेली नाहीत.
दहिसर येथील ‘धरम कन्स्ट्रक्शन’ कंपनीचे सूरज प्रतापसिंग देवडा यांचे सोमवारी कुर्ला पश्चिम कपाडिया नगर येथे रात्री ८च्या सुमारास मोटार अडवून गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात देवडा हे थोडक्यात बचावले, हा हल्ला म्हाडाचे टेंडर मागे घेण्याच्या वादातून झाला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते.

हे ही वाचा:

उर्फीचा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही!

१०० कोटी रुपयांचा घोटाळा किरीट सोमय्यांचा दावा

भारतात क्रूझ पर्यटनाला चालना मिळेल

पंकजा ताई भाजप सोडून कुठेच जाणार नाहीत

सरकारी ठेकेदार सुरज प्रतापसिंग यांची धरम कन्ट्रक्शन कंपनीने म्हाडा कडून वांद्रे ते दहिसर फुटपाथ, नाल्याचे, पायवाटा कामाचे टेंडर भरले होते. त्यात बारा ठेकेदारांनी देखील टेंडर भरले होते व त्यातील काही बाद झाली व चार ते पाच ठेकेदारापैकी हे काम धरम कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळण्याची शक्यता असल्यामुळे समीर सावंत आणि गणेश चुक्कल या दोघांनी सूरज प्रताप सिंग देवडा यांना म्हाडाचे टेंडर मागे घेण्यासाठी फोनवर धमकी दिली होती असा आरोप देवडा याने कुर्ला पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला होता. समीर सावंत व चुक्कल हे दोघे टक्केवारीवर काम कंत्राटे मिळवून देण्याचे काम करतात असे देवडा यांनी म्हटले होते.

या प्रकरणी कुर्ला पोलिसांकडून समीर सावंत आणि गणेश चुक्कल यांच्यासह ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान कुर्ला पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेऊन भिवंडी येथून अटक करण्यात आली आहे. सावंत आणी चुक्कल हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

Exit mobile version