अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणात चार जण अटकेत

अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणात चार जण अटकेत

अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयाला गेल्या आठवड्यात लागलेल्या आगीच्या संदर्भात पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी आणि तीन परिचारिकांचा समावेश आहे. त्यांच्या विरोधात जिल्हा रुग्णालयाने निलंबनाची कारवाई केली असून त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात अहमदनगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत एकूण ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलीस तक्रार करण्यात आली असून अज्ञात व्यक्तींच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा:

नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? हर्षदा रेडकर यांची पोलीस तक्रार

९६ देश टोचणार कोव्हीशिल्ड, कोव्हॅक्सिन

न्यूझीलंड सोबतच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

ठाकरे सरकारचे कपडे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले

तर पोलिसांनी या प्रकरणात तपास करून चार जणांना अटक केली आहे. या मध्ये वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत या चार जणींचा समावेश आहे. यातील विशाखा शिंदे आणि सपना पठारे यांना निलंबित करण्यात आले आहे. तर आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांची सेवा समाप्त करण्याचा आदेश आरोग्य विभागाने दिला आहे. मंगळवार ९ नोव्हेंबर रोजी ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान या निलंबनाच्या आणि अटकेच्या कारवाई विरोधात परिचारिका संघटना आक्रमक झाली आहे. ही अन्यायकारक असल्याचे परिचारिका संघटनेकडून सांगण्यात येत आहे. त्यांनी या निलंबनाच्या विरोधात आंदोलन केले असून अटकेच्या कारवाई विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Exit mobile version