…आणि त्यांनी लांबवले १० मोबाईल, पाकिटे

…आणि त्यांनी लांबवले १० मोबाईल, पाकिटे

गर्दीत खिसे कापणाऱ्या चार आरोपींना गुन्हे शाखेच्या वागळे युनिट पाचने बेड्या ठोकल्या आहेत. या चौघांवरही राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत भुरट्या चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

चोरट्यांकडून चारचाकी गाडी, १० मोबाईल आणि लाखभर रोकड असा ऐवज सापडला आहे. अधिक तपासातून इतर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या सुरू असलेल्या जन आशिर्वाद यात्रे दरम्यान लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा घेत चार आरोपी लोकांचे मोबाईल आणि पाकीट चोरी करत होते. लोकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हे शाखेच्या वागळे युनिट पाचने या प्रकरणाचा तपास करत अब्दुल अन्सारी, नदीम अन्सारी, अतिक अहमद आणि आशिक अन्सारी या चार आरोपींना शिळफाटा येथून अटक केली. हे चारही जण मालेगावचे रहिवासी आहेत. आरोपींकडून एक चारचाकी, १० मोबाईल आणि एक लाख १८ हजार रुपयांची रोकड हस्तगत केली गेली.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाही थोडे ब्रह्मज्ञान द्यावे

भीम राखी, स्पायडरमॅन राखी, फॅन्सी राखी, बांबूंच्या राखी….

…रेल्वे पोलिसांमुळे अखेर मुले आईवडिलांना बिलगली

आरटीओ विभागातही ‘रहदारी’ची कोंडी

युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, अनिल सुरवसे, उपनिरीक्षक बाबू चव्हाण, शरद तावडे, सुनील अहिरे, देविदास जाधव, विजयकुमार गोऱ्हे, जगदीश न्हावळदे, दिलीप शिंदे, शिवाजी रायसिंग, अजय फराटे, राजेंद्र गायकवाड, मनोज पवार, अजित शिंदे, रघुनाथ गार्डे, सागर सुरवळकर, यश यादव, सुजाता शेलार आणि मोहन भानुशाली यांनी तपास करून ही कारवाई केली. या चार आरोपींवर मालेगाव, एम.एफ.सी, वाशी, भद्रकाली, सटाणा पोलीस ठाण्यात १२ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी दिली.

Exit mobile version