मुंबई-सीबीआय अधिकारी बनून व्यवसायिकला लुटण्यासाठी आलेल्या चौघांना गोरेगाव मधून अटक करण्यात आली आहे.
जीवन उर्फ विपुल अहिर (५२), गिरीश वालेचा (२९), राहुल शंकर गायकवाड (४३) आणि किशोर चायबल (५२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४३ वर्षीय तक्रारदार व्यवसायिक यांचे गोरेगाव पश्चिमेतील उन्नत नगर येथे कार्यालय आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याला त्याच्या व्यवसायासाठी सुमारे १.६ कोटी रुपयांच्या कर्जाची गरज होती. त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीने कौस्तुभ नावाच्या व्यक्तीची भेट करून दिली व कौस्तुभ तुम्हाला कर्ज मिळवून देईल असे सांगितले होते.
कौस्तुभने कमिशन म्हणून ५ लाख घेणार असे सांगितले असता व्यवसायिकाने ते मान्य करून ३० सप्टेंबर रोजी काही तुमच्या कार्यालयात येऊ तुम्ही पैसे तयार ठेवा असे कौस्तुभ याने सांगितले. ३० सप्टेंबर रोजी कौस्तुभ आणि त्याच्या सोबत विपुल नावाची व्यक्ती आली व व्यवसायिकांनी त्यांना ५ लाख रुपयांची बॅग दाखवली. त्या व्यक्तीने आपले नाव विपुल असून तो सीबीआयमध्ये असल्याचा दावा केला. विपुलने कॅश बॅग घेऊन कोणाला तरी बोलावले. काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये आणखी चार जण आले आणि त्यापैकी दोघांनी आपण सीबीआय अधिकारी असल्याचेही सांगितले. त्यांनी व्यवसायिकाकडे प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. एका आरोपीने तक्रारदाराला सांगितले की, जर त्याने त्यांना ५ लाख रुपये दिले तर ते प्रकरण मिटवतील.
हे ही वाचा:
अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर, भाजपाकडून मुरजी पटेल रिंगणात
भारतीय हवाई दलाला मिळाली स्वदेशी ‘प्रचंड’ ताकद
दुर्गापूजा मंडपात आग लागून ५२ जण जखमी, तीन जणांचा मृत्यू
नवरात्र २०२२: तिबेटमधील शक्तीपीठ असलेली मनसा देवी
घाबरलेल्या व्यवसायिकाने रोख बॅग त्यांच्या हातात दिली आणि तेथून बाहेर पडले. मात्र स्कॉर्पिओ पाहिल्यानंतर त्यात खासगी क्रमांक असल्याचे व्यवसायिकाच्या लक्षात आले. त्याने ताबडतोब आपल्या कर्मचाऱ्यांना सावध केले आणि त्यांनी दोघांना पकडले, तर इतर पळून गेले. पकडलेल्या दोघांना गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात देऊन तक्रार दाखल करण्यात आली. या दोघांना ताब्यात घेऊन इतर दोघांची नावे समोर आली. गोरेगाव पोलिसांनी आणखी दोघांना गोरेगाव परिसरातून ताब्यात घेऊन चौघांना अटक करण्यात आली आहे, का पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला संशय आहे की यात अनेक लोक सामील असावेत याबाबत चौकशी सुरू आहे. अटक आरोपींना स्थानिक न्यायालयाने ६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.