आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्या चौघांच्या मुसक्या आवळल्या

एटीएसची गुजरातमध्ये मोठी कारवाई  

आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्या चौघांच्या मुसक्या आवळल्या

दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गुजरातमध्ये मोठी कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्या चार जणांना अटक केली आहे. यात एका परदेशी नागरिकाचाही समावेश आहे. एटीएसने या कारवाईची माहिती दिली आहे.

गुजरात येथील पोरबंदर येथे एटीएसने धडक कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणाने चार जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात एका परदेशी नागरिकाचाही समावेश आहे. एटीएसचे विशेष पथक गेल्या काही दिवसांपासून पोरबंदर आणि परिसरात विशेष कारवाईसाठी सक्रिय होते. या कारवाईची माहिती दहशतवाद विरोधी पथकाकडून देण्यात आली आहे.

याआधी गुजरात एटीएसने मोठी कारवाई करत अल- कायदा इंडियाशी संलग्न गटाच्या मुसक्या आवळल्या होत्या. तीन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. तरुणांना कट्टरपंथी बनवण्याचे त्यांचे प्रयत्न होते. दहशतवादी कारवायांसाठी त्यांना परदेशातून निधी मिळत असल्याचे समोर आले होते.

Exit mobile version