जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना शुक्रवारी ५३८ कोटींच्या कॅनरा बँक घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांची ईडीने शुक्रवारी चौकशी केली. ती चौकशी झाल्यानंतर ही अटक केली गेली आहे. यावर्षी मे महिन्यात सीबीआयने गोयल यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविला होता. मुंबईतील गोयल यांच्याशी संबंधित मालमत्तांवर ५ मे रोजी सीबीआयने छापेमारी केली होती. त्यात गोयल यांचे निवासस्थान आणि कार्यालये यांचाही समावेश होता.
गेल्यावर्षी गोयल यांच्याविरुद्ध फसवणुकीसंदर्भात लेखी तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यात कट रचणे, विश्वासघात आणि गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य असेही आरोप आहेत. कॅनरा बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक पी. संतोष यांनी ही तक्रार दाखल केली होती. बँकेचे ५३८.६२ कोटी रुपयांचे नुकसान केल्याबद्दल अनिता नरेश गोयल, गौरांग आनंदा शेट्टी, एक अज्ञात सरकारी अधिकारी व इतर यांच्याविरोधातही कॅनरा बँकेने ही तक्रार केली होती.
हे ही वाचा:
एका महिलेच्या मानसिक त्रासाला कंटाळून सुधीर मोरे यांची आत्महत्या
राहुल गांधींवर ममता बॅनर्जी नाराज?
महायुतीच्या त्रिशुळाने विरोधकांना घेतले धारेवर
‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचे डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते जलावतरण
जेट एअरवेजने २०१९मध्ये आपले सगळे व्यवहार बंद केले. जवळपास २५ वर्षे जेट एअरवेज कार्यरत होती. पण नंतर प्रचंड नुकसान झाल्यावर ते भरून काढण्यासाठी निधी उभारण्यात त्यांना यश आले नाही.