सपा नेत्याने दिली होती सेंट्रल व्हिस्टा बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांनी केली अटक

३० सप्टेंबर रोजी संसद भवन उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती

सपा नेत्याने दिली होती सेंट्रल व्हिस्टा बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांनी केली अटक

संसद उडवण्याची धमकी दिल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे माजी आमदार किशोर सम्रिते यांना दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. किशोर सम्रिते यांनी शनिवारी संसदेच्या अध्यक्षांच्या कार्यालयाला पॅकेज लेटर पाठवले होते, ज्यात त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास ३० सप्टेंबर रोजी संसद भवन उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. तेव्हापासून दिल्ली पोलिसांकडून किशोर सम्रितेचा शोध सुरू होता.

मध्य प्रदेशातील बालाघाटमधील लांजी जिल्ह्यातील माजी आमदार किशोर सम्रिते यांना दिल्ली पोलिसांनी भोपाळमधून अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी आमदार किशोर सम्रिते यांनी या भागातील समस्या सोडविल्या नाहीत तर सभापतींना पत्र लिहू, तसेच केंद्र सरकारला पत्र लिहून सेंट्रल व्हिस्टा उडवून देऊ, अशी धमकी दिली होती.

किशोर सम्रिते हा भोपाळच्या कोलार येथील आर्केड पॅलेसमध्ये असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती
दिल्ली पोलिसांच्या पथकाने भोपाळला पोहोचल्यानंतर माजी आमदार किशोर सम्रिते यांना अटक केली आणि ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला नेले. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

हे ही वाचा:

पत्राचाळ प्रकरणातून मिळालेल्या पैशात संजय राऊत परदेश दौऱ्यावर गेले

“मास्क न वापरलेल्यांकडून कायद्याच्या कोणत्या तरतुदीनुसार दंड वसूल करण्यात आला?”

बायबलच्या ओळी वाचून पंतप्रधान ट्रस यांनी दिला एलिझाबेथना निरोप

अमरिंदर यांच्यासह त्यांचा पक्षही भाजपात विलिन

विशेष पोलिस आयुक्त (गुन्हे) रवींद्र यादव म्हणाले की, लोकसभा कार्यालयाला एक पत्र, एक राष्ट्रध्वज आणि जिलेटिनच्या काठ्या असलेले पॅकेज मिळाले आहे. आम्ही या संदर्भात गुन्हा दाखल केला होता आणि एक पथक भोपाळला अटक करण्यासाठी पाठवले होते, त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने सोमवारी त्याला अटक करण्यात आली.

अनेक गुन्हे दाखल आहेत

किशोर सम्रिते हे एकेकाळी एनएसयूआयचे विद्यार्थी नेते होते आणि नंतर ते जनता दलात सामील झाले. त्यानंतर २००७ मध्ये त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आणि पोटनिवडणुकीत निवडणूक लढवली. या काळात ते जेमतेम १०-११ महिने आमदार होते. किशोर सम्रिते यांच्यावर जाळपोळ, खंडणी व दंगलीशी संबंधित १७ गुन्हे दाखल आहेत.

Exit mobile version